आम्ही वारकरी परिवाराकडून ग्रंथ ज्ञानेश्वरी पारायण सोहळा
१३ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर २०२६ पांगरी येथे ग्रंथ ज्ञानेश्वरी वितरण व सन्मान सत्कार सोहळ्यात १७०० ग्रंथाचे वितरण सोहळा

नांदेड/प्रतिनिधी,दि.4
नांदेड पासुन जवळच असलेल्या पांगरी ता. नांदेड येथे आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेकडून गेल्या नऊ वर्षापासून घर तिथे ज्ञानेश्वरी! घरोघरी ज्ञानेश्वरी!! हा उपक्रम नांदेडसह संपूर्ण महाराष्ट्रभर राबविण्यात येत आहे. दरवर्षी श्रावण शुद्ध प्रतिपदा ते भाद्रपद षष्ठी या कालावधीमध्ये आप आपल्या घरीच साधकांनी आपल्या सोयीच्या वेळेनुसार दि. १३ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर २०२६ दिलेल्या वेळा पत्रकाप्रमाणे पारायण करण्याचा नेम गेल्या नऊ वर्षापासून आम्ही वारकरी परिवाराच्या माध्यमातून सुरू आहे. यापूर्वी साधकांना १०,५०० ग्रंथ वितरित करण्यात आले होते. यावर्षी त्यामध्ये भर पडली असून यावर्षी महाराष्ट्रातील परभणी, हिंगोली,लातूर,पुणे, नाशिक, ठाणे,मुंबई,सोलापूर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये एकूण १७००ग्रंथ संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष
हभप राम महाराज पांगरेकर यांच्या निवाह्सस्थानी पांगरी ता.जि.नांदेड येथे वितरण करण्यात आले. मा. आदरणीय जगन्नाथरावजी चक्रवार सावकार नांदेड जिल्हा उपाध्यक्ष यांच्याकडून ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या १००० पारायण प्रती भेट देण्यात आल्या. याप्रसंगी संस्थेच्या वतीने अनेक मान्यवरांचा सन्मान सत्कार करण्यात आला याप्रसंगी खालिल मान्यवर उपस्थित होते.संस्थेचे सचिव व्यंकटराव महाराज माळकौठेकर, सहसचिव प्रभाकर महाराज सल्लागार शिवाजीराव पांगरेकर, राज्य प्रसिद्धीप्रमुख चंपतराव पा.डाकोरे पाटिल, संस्थापक सदस्य प्रवीण महाराज पार्डीकर,भगवान पा. रहाटीकर,त्रिमुख पा.एडके, नांदेड जिल्हा अध्यक्ष पंढरीनाथ महाराज मुरकुटे, परभणी जिल्हा अध्यक्ष आकाश महाराज खोकले, संभाजीनगर जिल्हाध्यक्ष उत्तमराव मल्हारे, लातूर जिल्हा संपर्कप्रमुख गोविंद माऊली इबीतदार, नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख दीनाजी सांगळे,प्रसिद्धीप्रमुख ओमप्रकाश ढाले, मारोती पा.वडजे, माधवराव बोईनवाड, नागोराव मेंडेवाड, विवेकानंद पा.कसरे,प्रभाकर पा.पवळे, बाळू पा.धुमाळ, राजू पा.गागलेगाव, उत्तमराव टाक, सौ.कुसुमताई शिंदे, गणेश पा.पवार, मनोहर येरपूरवाड,सोपान गिरे, बालाजी शिंदे,विशेष उपस्थिती श्री गौरव भाऊ कोडगिरे, संजय पा.ढाले, सतीश चितळकर तथा नांदेड जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील अनेक वारकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राम महाराज पांगरेकर यांचे ज्येष्ठ बंधू श्री गंगाराम पांगरेकर यांनी केले होते.
असे प्रसिध्दी पत्रक आम्ही वारकरी परिवारचे प्रसिद्ध प्रमुख चंपतराव डाकोरे पाटील यांनी दिली




