pub-7425537887339079
ब्रेकिंग

उरण महाविद्यालयात जर्मन व जपानी भाषा प्रशिक्षण

0 4 3 4 0 7
[sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.15

आजच्या स्पर्धात्मक युगात नवनवीन कौशल्य विद्यार्थ्यांना आत्मसात करणे गरजेचे आहे. त्याचा एक भाग म्हणजे परदेशी भाषा अवगत असणे होय. सद्यस्थितीत जर्मनी आणि जपान या दोन देशांमध्ये मनुष्यबळाची तीव्र कमतरता निर्माण झाली आहे त्याचा परिणाम त्यांच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे म्हणून महाराष्ट्र शासन आणि जर्मनी देशा अंतर्गत करार झाला असून महाराष्ट्रातील दहा हजार लोकांना रोजगाराची संधी यातून मिळणार आहे. तसेच जपान देशासोबत झालेल्या करारा नुसार पाच लाख लोकांना रोजगार संधी मिळणार आहे.मात्र या देशांमध्ये जायचे असेल तर तेथील भाषा अवगत असणे आवश्यक आहे. याचा विचार करून उरण आणि परिसरातील गरजूंना कोकण ज्ञानपीठ उरण महाविद्यालयात जर्मन व जपानी भाषा प्रशिक्षण वर्ग नवीन शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात येत आहेत जर्मनीच्या प्रसिद्ध गोथें इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने तज्ञ शिक्षक हे प्रशिक्षण देणार आहेत. भाषेचे प्रशिक्षण घेतल्या नंतर मुंबई व नवी मुंबई येथील जपानी व जर्मन उद्योगा मध्ये नोकरीच्या संधी प्राप्त होणार आहेत तसेच जर्मनी व जपान मध्ये जाऊन तेथे ही नोकरी ची संधी मिळणार आहे. बारावी पास तसेच आय.टी. आय. विद्यार्थी, तंत्र शिक्षण घेतलेले,कौश्यल्य शिक्षण प्राप्त तरुण व गरजूंनी या संधीचा लाभ घ्यावा आणि प्रवेशासाठी महाविद्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन प्राचार्य डॉ. वाल्मिक गर्जे यांनी केले आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 4 0 7
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे