pub-7425537887339079
ब्रेकिंग

पूर्णा नदीत महसूल-पोलिसांचा संयुक्त मोहिमेत ४ बोटी उद्धवस्त

0 4 3 4 0 7
[sp_wpcarousel id="1375"]

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.19

जाफ्राबाद तालुक्यातील हनुमंतखेडा परिसरातील पूर्णा नदीपात्रात सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपसा विरोधात महसूल आणि पोलिस प्रशासनाने दिनांक. १८ मे २०२६ रोजी सोमवारी पहाटे मोठी संयुक्त धडक कारवाई करत वाळू माफियांच्या ४ बोटी जागीच उद्धवस्त करून नदीत बुडवल्या. जाफ्राबाद तालुक्यातील अवैध वाळू वाहतूक दारांच्या मुसक्या आवळण्यासाठी प्रशासनाने पहिल्यांदाच एवढी मोठी आणि संयुक्त आक्रमक मोहीम राबवल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पूर्णा नदीपात्रातून अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळू उपसा सुरू होता. महसूल विभागाचे पथक कारवाईसाठी गेल्यानंतर संबंधित बोटी नदीपात्रातून पळ काढत असल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. मात्र यावेळी महसूल आणि पोलिस विभागाने अत्यंत गुप्त आणि चोख नियोजन करत पहाटे संयुक्त मोहीम उघडली. प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचताच वाळू माफियांची एकच धांदल उडाली. कारवाईदरम्यान नदीपात्रात सुरू असलेला अवैध वाळू उपसा बंद पाडण्यात आला. त्यानंतर वाळू काढण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ४ हायटेक बोटी जागीच उद्ध्वस्त करून नदीत बुडवण्यात आल्या. तसेच वाळू उपशासाठी वापरली जाणारी मशीन्स, पाइपलाइन, इंजिन आणि इतर साहित्यही नष्ट करण्यात आले. या संपूर्ण कारवाईत नष्ट करण्यात आलेल्या साहित्याची किंमतअंदाजे २ कोटी रुपये असेल असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ही कारवाई जिल्हाधिकारी असिमा मि त्तल आणि पोलिस अधीक्षक तेजबीर सिंग संधू यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. उपविभागीय अधिकारी भोकरदन बी. सर्वंनन, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नितीन कटेकर, पोलीस निरीक्षक सतीश जाधव, परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार अविनाश पाटील लोढे, नायब तहसीलदार मंगेश साबळे यांच्यासह महसूल व पोलिस विभागाच्या संयुक्त पथकाने प्रत्यक्ष घटनास्थळी उतरून कारवाई केली. या मोहिमेत ग्राम महसूल अधिकारी किशोर खंदारे, बी. जी. ब्राम्हणे, अण्णा कड, गजानन भालके, प्रभाकर शेणेवाड, अम ोल मुरकुटे, सागर शेळके, अक्षय येलवंटे, सचिन गुळवे तसेच पोलिस कॉन्स्टेबल विजय जाधव, अनिल सवडे, विष्णू जायभाय आणि गणेश घुशींगे यांनी सहभाग घेतला. दरम्यान, पूर्णा नदीपात्रातील वाढता अवैध वाळू उपसा पर्यावरणासाठी धोकादायक ठरत असून नदीपात्राची मोठ्या प्रमाणात हानी होत असल्याची तक्रार नागरिकांकडून सातत्याने केली जात होती. अखेर प्रशासनाने घेतलेल्या या कठोर कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले असून, आगामी काळातही अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात आणखी कठोर मोहीम राबवल्या जाणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून स्पष्ट देण्यात आले आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 4 0 7
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे