pub-7425537887339079
ब्रेकिंग

वस्तिगृह व निवासी शाळेची गुणवत्ता सुधारण्यासाठी संयुक्त प्रयत्न करणार!

लेखी आश्वासन मिळाल्याने आम आदमी पार्टीचे भोकरदन येथील आमरण उपोषण मागे - बोरशे गुरुजी

0 4 8 3 4 5
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.29

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय मुलींचे वसतिगृह, भोकरदन येथे दि. 05.08.2026 रोजी 4 ते 5 विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झाल्याच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीच्या वतीने दि. 25.08.2026 रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय, भोकरदन येथे आमरण उपोषणाचे आयोजन करण्यात आले होते.

या उपोषणाच्या अनुषंगाने सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जालना (डॉ. अनिता राठोड मॅडम) यांनी लेखी आश्वासन दिले असून त्यांच्या पत्र क्र. 2476 दि. 25.08.2026 अन्वये खालील कार्यवाही करण्याचे मान्य केले आहे:

1. सदर भोजन पुरवठादार मे. D.M.K. Enterprises च्या किराणा मालाची तपासणी सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, छत्रपती संभाजीनगर येथे पाठविण्यात आली असून अहवाल येताच 15 दिवसात दोषींवर दंडात्मक व प्रशासकीय कारवाई करण्यात येईल.
2. वसतिगृहामध्ये CCTV व तक्रार पेटी कार्यान्वित असून बायोमेट्रिक प्रणाली बसविण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास पाठविण्यात येईल.
3. यापुढे विद्यार्थिनींनी लेखी तक्रार दिल्यास संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल.

तसेच संयुक्त बैठकीत असे ठरले की,

– प्रत्येक आठवड्यात आम आदमी पार्टीचे पदाधिकारी वसतिगृहात जाऊन जेवणाची चव घेणार आणि पाहणी करणार आहेत.
– पत्रातील आश्वासनांचा पाठपुरावा पार्टी आणि सहाय्यक समाज कल्याण आयुक्त संयुक्तपणे करणार आहेत.
– वसतिगृह व निवासी शाळांमध्ये सुधारणा होण्यासाठी संयुक्त प्रयत्न करण्यात येणार आहेत.

वरील सकारात्मक निर्णयामुळे पार्टी पदाधिकाऱ्यांच्या विचारांती आज दिनांक 25/08/2026 रोजीचे आमरण उपोषण मागे घेण्यात आले आहे. मात्र दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 3 4 5
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे