pub-7425537887339079
ब्रेकिंग

देऊळगाव राजा वनपरिक्षेत्रात दोन नीलगायींना जीवदान; वनविभाग व युनायटेड ग्लोबल फेडरेशन इंडिया यांची यशस्वी बचाव मोहीम

0 4 4 2 0 8
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.8

देऊळगाव राजा तालुक्यातील धोत्रा नांदई परिसरातील एका पाण्याच्या तळ्याजवळ असलेल्या चिखलयुक्त खड्ड्यात दोन नीलगायी तब्बल दोन दिवसांपासून अडकून पडल्या होत्या. चिखलात खोलवर रुतल्यामुळे त्यांना अनेक प्रयत्न करूनही बाहेर पडता येत नव्हते. दिनांक 6 जून 2026 रोजी स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती वनविभागाला दिली. माहिती मिळताच देऊळगाव राजा वनपरिक्षेत्राचे RFO उमेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले. वन्यजीव रक्षक वैभव लाखोले तसेच युनायटेड ग्लोबल फेडरेशन इंडियाच्या रेस्क्यू टीमला घटनास्थळी पाठविण्यात आले. रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचल्यावर दोन नीलगायींपैकी एका नीलगायीच्या तोंडातून रक्तस्त्राव होत असल्याचे दिसून आले. स्थानिक नागरिकांकडून माहिती घेतल्यानंतर, चिखलातून बाहेर पडण्यासाठी सतत प्रयत्न करताना तिला दुखापत झाल्याचे समजले. वनविभाग आणि युनायटेड ग्लोबल फेडरेशन इंडियाच्या रेस्क्यू टीमकडे अत्याधुनिक बचाव साहित्य उपलब्ध नसतानाही त्यांनी धाडसाने बचाव मोहीम हाती घेतली. नीलगायी मोठ्या प्रमाणात चिखलात रुतल्यामुळे त्यांना बाहेर काढणे अत्यंत कठीण ठरत होते. मात्र टीमच्या अथक प्रयत्नांमुळे अनेक तासांच्या परिश्रमानंतर दोन्ही नीलगायींना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले. बचाव कार्यादरम्यान नीलगायींना कोणतीही अतिरिक्त दुखापत होणार नाही याची विशेष काळजी घेण्यात आली. यशस्वी रेस्क्यूनंतर दोन्ही नीलगायींना पुन्हा त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले. वनविभाग, देऊळगाव राजा आणि युनायटेड ग्लोबल फेडरेशन इंडिया यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे दोन वन्यजीवांना नवजीवन मिळाले. वन्यजीव संरक्षणासाठी प्रशासन आणि सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन केलेल्या कार्याचे हे एक प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 4 2 0 8
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे