राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कूलमध्ये उत्साहात साजरा झाला शिक्षक दिन

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.8
टेंभुर्णी राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कूल, टेंभुर्णी येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ.सर्वपल्ली राधाकृष्ण, राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
या विशेष उपक्रमात विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका स्वीकारून संपूर्ण दिवस शाळेतील विविध शैक्षणिक व शिस्तीच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या.
विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या कार्याची, जबाबदारीची आणि कर्तव्याची जाणीव व्हावी, तसेच शिक्षकांविषयी आदर व कृतज्ञता निर्माण व्हावी, या उद्देशाने ‘Student Teacher’ हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिकेत वर्गात अध्यापन केले, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच शालेय कामकाजात सक्रिय सहभाग घेतला.
या उपक्रमात लहाने सर – अरमान शहा, लहाने मॅडम – साधना चव्हाण, फलटणकर सर – श्लोक फलटणकर, भगवत सर – गौरव सपाटे, तेलंग्रे सर – आरुष भिसे, उबरहांडे सर – रणवीर म्हस्के, वायाळ सर – विठ्ठल धारे, शिंगणे सर – जनार्दन म्हस्के, स्पोर्ट्स टीचर – पार्थ जाधव, सुद्रिक मॅडम – अदिती राऊत, सय्यद मॅडम – धर्ती रोकडे, मोरे मॅडम – श्रुती चव्हाण, बकाल मॅडम – रुतुजा मोरे, प्रियंका जाधव मॅडम – वैष्णवी बोराडे, राधिका मॅडम – सीमा म्हस्के, भालेराव मॅडम – प्रगती वरगणे, प्रियदर्शनी मॅडम – श्रुतिका करहाळे, शंकर सावडे – सुमित पवार, शंकर – जरार सय्यद, आंटी – शीतल सोनसाळे यांनी शिक्षकांच्या भूमिका पार पाडल्या.
तसेच सृष्टी चेके आर्या अरख, आराध्या उबारहांडे, आरती चव्हाण, प्रगती सपाटे, मंजिरी पिंपळे, कल्याणी सुसलादे, शिवराज जगदाळे, सोहम अदबाने आणि गौरी बोऱ्हाडेड या विद्यार्थ्यांनीही Student Teacher म्हणून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका अत्यंत आत्मविश्वासाने व जबाबदारीने पार पाडल्यामुळे शाळेतील वातावरण उत्साहपूर्ण झाले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना “शिक्षक होणे म्हणजे केवळ शिकवणे नव्हे, तर जबाबदारी, संयम, शिस्त आणि मार्गदर्शन यांचा सुंदर संगम आहे” याचा अनुभव मिळाला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद व शाळेतील विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती व्यक्त केलेल्या प्रेम, आदर आणि कृतज्ञतेमुळे हा दिवस अविस्मरणीय ठरला.

