pub-7425537887339079
ब्रेकिंग

नळविहिरा जि.प. शाळेत दिवाळी कार्यशाळा

0 5 0 5 0 7
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.1

जाफराबाद, दिवाळी हा प्रकाशाचा, आनंदाचा आणि उत्साहाचा सण असून, या सणाचे औचित्य साधत तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, नळविहिरा येथे दिवाळी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचा आणि कलागुणांचा सुंदर आविष्कार सादर करत विविध रंगांचे, आकर्षक व मनमोहक आकाशकंदील तयार केले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शाळेचे वातावरण आनंदमय आणि उत्साहपूर्ण झाले होते.

या कार्यशाळेदरम्यान मार्गदर्शक शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आकाशकंदील तयार करण्यासाठी आवश्यक असलेले साहित्य, त्याची रचना, रंगसंगती, कागदाची योग्य घडी, सजावट आणि आकर्षक मांडणी याविषयी मार्गदर्शन केले. शिक्षकांच्या

जि. प. उच्च प्राथमिक शाळा, नळ विहीरा

मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पनाशक्तीचा वापर करून विविध प्रकारचे आकाशकंदील तयार

केले. पारंपरिक पद्धतींसोबतच आधुनिक कलाकुसरीचा संगम साधत विद्यार्थ्यांनी तयार केलेले

स्वनिर्मितीचे महत्त्व समजले

दिवाळीच्या काळात बाजारातून सजावटीच्या वस्तू खरेदी करण्याऐवजी स्वतःच्या हातांनी आकर्षक वस्तू तयार करण्याचा आनंद विद्यार्थ्यांनी अनुभवला. कमी साहित्याचा वापर करून सुंदर कलाकृती कशी तयार करता येते, याची प्रात्यक्षिकातून माहिती मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. या उपक्रमामुळे हस्तकलेची आवड निर्माण होण्याबरोबरच स्वनिर्मितीचे महत्त्वही विद्यार्थ्यांना समजले. तर शालेय शिक्षणासोबतच कला, संस्कृती आणि सण-उत्सवांचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यता आहे. दिवाळी कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षणाचा अनुभव मिळाला.

आकाशकंदील सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देणे, त्यांच्यामध्ये कलागुण विकसित करणे आणि प्रत्यक्ष कृतीतून शिकण्याची संधी उपलब्ध करून देणे, हा या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये कल्पक विचार करण्याची क्षमता, एकाग्रता, संयम, कौशल्य आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. तसेच एकमेकांना सहकार्य करून काम करण्याची सवयही विद्यार्थ्यांमध्ये विकसित होते. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सुंदर आकाशकंदिलांमुळे दिवाळीच्या सणातील उत्साह अधिकच द्विगुणीत झाला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारी ही दिवाळी कार्यशाळा शैक्षणिक उपक्रमांसोबतच आनंददायी शिक्षणाचे उत्तम उदाहरण म्हणजे ही कार्यशाळा असल्याचे शिक्षकांनी म्हटले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 0 5 0 7
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे