pub-7425537887339079
ब्रेकिंग

डी के ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित केलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक.

0 4 5 5 2 6
[sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि 2

एक हात मदतीचा या विचारसरणीने व फुले शाहू, आंबेडकर विचारसरणीचे डी.के.ग्रुप चे अध्यक्ष दिनेशभाई गायकवाड व त्यांचे सहकारी बळीराम मसन , कुणाल म्हात्रे यांनी करंजा येथील राजिप प्राथमिक शाळा फिशिरीष करंजा तालुका उरण रायगड येथील शाळकरी मुलांना बॅग वाटप केले. मुलांनी शिक्षणाकडे वळून शिक्षणाची कास पकडली पाहिजे, कारण शिक्षण हे आपल्या जीवनात बदल आणू शकतो असे दिनेशभाई गायकवाड यांनी सांगितले , ते म्हणाले की जेव्हा गरज लागेल तेव्हा माझ्याकडून सर्वतोपरी मदत मिळेल असे आश्वासन दिले. या उपक्रमांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.असे थोर समाजसेवक आम्हास पुन्हा लाभावे असे करंजा मच्छीमार मराठी शाळा येथील शिक्षकांनी मत व्यक्त केले.या प्रसंगी संकेत पाटील.ऋषिकेश कासारे , सुनील गायकवाड, तौफिक शेख , संतोष मोघे , विकास निकाळजे आदी मान्यवर उपस्थित होते. छत्रपती शाहू महाराज यांची जयंती दिनाचे औचित्य साधून सोलापूर जिल्हा येथे दहिटणे गाव जिल्हा परिषद मराठी शाळा येथील शाळकरी विद्यार्थ्यांना विकी बाबा चौधरी ( रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आय) गटाचे प्रदेश अध्यक्ष सोलापूर यांच्या उपस्थितीत दिनेशभाई गायकवाड यांनी वही ,पेण ,पेन्सिल व शालेय उपयोगी वस्तूचे वाटप केले, गेली अनेक वर्षांपासून डी के ग्रुपच्या माध्यमातून अनेक गरजू विद्यार्थ्यांना सातत्याने मदत करण्यात येत आहे, त्यांचे म्हणणे असे आहे की आपल्या उत्पन्नातील २० वा भाग हा समाजातील गरजवंताच्या उपयोगी लावावा. मुलांनी शिकले पाहिजेत कारण शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे आवाहन त्यांनी केले. काही दिवसापूर्वी पनवेल नेरे येथील आश्रमात कपडे, व भोजन दान दिले. या कार्यक्रमावेळी संकेत पाटील.ऋषिकेश कासारे , सुनील गायकवाड,तौफिक शेख , संतोष मोघे , विकास निकाळजे आदी मान्यवर उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी जपत डी के ग्रुपच्या माध्यमातून विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आले. या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 5 5 2 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे