शेतकरी कामगार पक्षाचे शहर चिटणीस ऍड शेखर पाटील यांचा यांच्च्या वाढदिवसानिमित्त उरण तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद पिरकोन शाळा येथे वह्या वाटप खाऊ वाटप व शाळेला पंखा भेट देण्यात आले.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका नीलिमा मॅडम यांनी वाढदिवसानिमित्त औक्षण केले.प्रास्ताविकात जेएनपीटीचे शाळेचे प्राचार्य गिरीश पाटील यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले. मुख्य अतिथी सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे अध्यक्ष विलास गावंड यांनी शेखर पाटील यांच्या कार्याचा गौरव करून समाजाची सेवा करण्यासाठी शतायुषी व्हा अशी प्रार्थना केली. यावेळी शेखर पाटील आपल्या भाषणात म्हणाले माझ्या गावाने वाढदिवसानिमित्त माझा सत्कार केलेला आहे त्याबद्दल मी आपला ऋणी आहे समाजाचे सेवा करण्याचे व्रत कायम जोपासले जाईल.यावेळी सामाजिक संस्थेचे विभाग प्रमुख दिलीप पाटील, ग्रामपंचायत सदस्य अंकित पाटील, ग्रामपंचायत सदस्य निखिल गावंड,पिरकोन अध्यापक विद्यालयाचे व्हाईस चेअरमन आनंत गावंड मुख्याध्यापका नीलिमा म्हात्रे, सहशिक्षिका ज्योती बामणकर, स्कूल कमिटीचे अध्यक्षा आयुश्या गावंड, ग्रामस्थ व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.