pub-7425537887339079
ब्रेकिंग

गावासाठी मैदान हा ग्रामस्थांचा हक्क  : महेंद्रशेठ घरत 

उरण प्रीमियर लीगचे महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते उद्घाटन!

0 4 9 7 2 8
[sp_wpcarousel id="1375"]
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.26
“क्रिकेटचा मी निस्सीम चाहता आहे,पण आज तरुणांना खेळण्यासाठी मैदानेच नाहीत. ही गावोगावची खूप मोठी शोकांतिका आहे. गावासाठी मैदान हा ग्रामस्थांचा मूलभूत हक्क आहे. तो मिळालाच पाहिजे. तो मिळवण्यासाठी एक होणे ही काळाची गरज आहे. गावाच्या भल्यासाठी तरुण पेटून उठले तर काहीही अशक्य नाही. अशा कामात मी सदैव आपल्या पाठीशी आहे. आजही मी फोर्टी प्लसचा कॅप्टन आहे. मी अनेक गावांना मैदाने मिळवून दिली. जमिनी आपल्या आहेत, त्यावर हक्क आपलाच आहे. त्यासाठी तरुणांची एकजूट महत्त्वाची आहे. गावाच्या विकासासाठी राजकीय चपला बाजूला ठेवा, मी बघा शेलघर कसे बनवले आहे. स्वतः रस्त्यावर उतरून गावचा विकास केला. मला तरुणांकडून हेच अपेक्षित आहे.” असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत महानगर येथे म्हणाले.
उरण प्रीमियर लीगच्या सहाव्या पर्वाचे सोमवारी (ता. २६)  महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते मानघर येथील छाया रिसॉर्ट येथे उद्घाटन झाले. यावेळी महेंद्रशेठ घरत बोलत होते. यावेळी शेकाप नेते दीपक मढवी, विशाल पाटील, मध्य प्रदेशच्या मऊगंज येथील पतुलखी छत्रपाल सिंहच्या
 सरपंच अनुराधा साकेत, राजेंद्र भगत, आयोजक अतुल मढवी, कल्पेश पाटील उपस्थित होते. सुप्रसिद्ध सूत्रसंचालक नितेश पंडित यांनी उत्तम असे सूत्रसंचालन केले.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 9 7 2 8
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे