pub-7425537887339079
ब्रेकिंग

माहोरा केंद्रीय प्राथमिक शाळेत मोफत पुस्तकांचे वाटप पहिल्याच दिवशी इयत्ता पहिलीच्या वर्गात १३ विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश

0 4 4 9 7 6
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.18

जाफ्राबाद तालुक्यातील माहोरा जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी इयत्ता पहिलीच्या वर्गात १३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. या विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक अनिल गवई व केंद्र प्रमुख ज्ञानेश्वर सोनुने यांनी स्वागत करून इयत्ता १ ते ४ पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. या वेळी जाफ्राबादचे गटविकास अधिकारी लिबाजी बारगिरे, लेखा अधिकारी सतिश चंदनशिवे, सरपंच गजानन पा. लहाने यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, माहोरा येथे मराठी व इंग्रजी माध्यमातून मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घ्यावा, असे आवाहन जेष्ठ शिक्षिका अर्चना भांडेकर, सविता काळे, सुनिता बडगुजर, मधुकर इंगळे यांनी केले आहे. या कार्यक्रमाला विलास पाटील लहाने, आसाराम पोपळे, सय्यद अहमद, दिनेश वाघमारे, संतोष गौरकर, बाळासाहेब गव्हले व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 4 9 7 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे