pub-7425537887339079
ब्रेकिंग

आम्ही वारकरी परिवाराकडून संपूर्ण महाराष्ट्रात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन..

0 4 7 9 9 4
[sp_wpcarousel id="1375"]

नांदेड/प्रतिनिधी,दि.12

आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेकडून गेल्या नऊ वर्षापासून घर तिथे ज्ञानेश्वरी! घरोघरी ज्ञानेश्वरी!! हा उपक्रम नांदेड सह संपूर्ण महाराष्ट्रभर राबविण्यात येत आहे. दरवर्षी श्रावण शुद्ध प्रतिपदा ते भाद्रपद षष्ठी या कालावधीमध्ये आपआपल्या घरीच साधकांनी आपल्या सोयीच्या वेळेनुसार दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे पारायण करण्याचा नेम गेल्या नऊ वर्षापासून आम्ही वारकरी परिवाराच्या माध्यमातून सुरू आहे. यापूर्वी महाराष्ट्रातील साधकांना १०५०० ग्रंथ वितरित करण्यात आले होते. यावर्षी त्यामध्ये आणखी भर पडली असून यावर्षी महाराष्ट्रातील परभणी, हिंगोली,लातूर,पुणे,नाशिक, ठाणे,मुंबई,सोलापूर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये एकूण २००० ग्रंथ वितरण करण्यात आले. यावर्षी एकूण १२५०० च्या वर साधक पारायण करण्यासाठी बसले आहेत.
आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था,नांदेड महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष हभप राम महाराज पांगरेकर यांच्या नेतृत्वाखाली संपुर्ण महाराष्ट्रात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा उत्साहात व्हावा या दृष्टीने सर्व साधकाना पारायण करण्याची माहिती कॉल,मेसेज करुन वेळापत्रक त्यांच्या मोबाईलवर, गावातील लाऊडस्पीकर वर पारायण करण्याचे आव्हान अध्यक्ष हभप राम महाराज पांगरेकर,
संस्थेचे सचिव व्यंकटराव महाराज माळकौठेकर यांनी केले.पारायण सोहळा संपन्न करण्यासाठी संस्थेचे मार्गदर्शक रावसाहेब पा. शिराळे ,दत्तराम पा. एडके, रामजी पा.शिंदे व्यंकटराव कपाटे, सहसचिव प्रभाकर महाराज पिंपळगावकर, सल्लागार शिवाजीराव पांगरेकर, राज्य प्रसिद्धीप्रमुख चंपतराव पा.डाकोरे, संस्थापक सदस्य प्रवीण महाराज पार्डीकर,भगवान पा. रहाटीकर,त्रिमुख पा.एडके,गुलाबराव पा.उबाळे,हरिनाम पा.कदम,शिवाजी मदमवाड, बंडू पा.कदम, नांदेड जिल्हाध्यक्ष पंढरीनाथ महाराज मुरकुटे, उपाध्यक्ष जगन्नाथराव चक्रवार सावकार,नांदेड जिल्हा सचिव बालाजी पा. शिंदे,
परभणी जिल्हाध्यक्ष आकाश महाराज खोकले, संभाजीनगर जिल्हाध्यक्ष उत्तमराव मल्हारे, लातूर जिल्हा संपर्कप्रमुख गोविंद माऊली इबीतदार, नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख दिनाजी सांगळे,ठाणे जिल्हाध्यक्ष कमलाकर वारे, जिल्हाप्रसिद्धीप्रमुख ओमप्रकाश ढाले, मारोती पा.वडजे, माधवराव बोईनवाड, नागोराव मेंडेवाड, विवेकानंद पा.कसरे,प्रभाकर पा.पवळे, बालाजी पा.पवार, बाळू पा.धुमाळ,राजू पा.गागलेगाव,मदन घुगे,विठ्ठल पा. धारजणे,विश्वनाथ बंडे, कृष्णा पा.भरकडे,सोपान पा.गिरे, मधुसूदन पा.कदम, बाळू पा.देवकते, सौ.अनिताताई पतंगे,सौ.कुसुमताई शिंदे, कान्होपात्राताई कस्तुरे,गणेश पा.पवार, मनोहर येरपूलवाड,तथा नांदेड जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी शाखाध्यक्ष सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.
असे प्रसिध्दी पत्रक आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था महाराष्ट्र प्रसिध्दी प्रमुख चंपतराव डाकोरे पाटील यांनी दिले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 7 9 9 4
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे