pub-7425537887339079
ब्रेकिंग

व्यवस्थेचा पुन्हा एक बळी!करजगाव येथील तरुण शेतकरी दामोदर सिताराम बोरसे यांनी केली आत्महत्या!

0 5 0 4 7 0
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.1

करजगाव ता. भोकरदन येथील अत्यंत कष्टाळू आणि प्रामाणिक युवा शेतकरी स्व. दामोदर सीताराम बोरसे (वय ३४, जन्म ०५/०६/१९९२) यांनी शेतीच्या सततच्या अपयशाला आणि शासनाच्या तुटपुंज्या मदतीच्या घोषणेमुळे आलेल्या नैराश्यातून दिनांक २८ ऑक्टोबर २०२६ रोजी विष प्राशन केले. घाटी रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत दिनांक ०१ नोव्हेंबर २०२६ रोजी मालवली. या घटनेने संपूर्ण करजगाव आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
आत्महत्येमागील विदारक वास्तव:
१. निसर्गाचा कोप: यावर्षी मक्याचे पीक पूर्णपणे हातचे
गेले. पीक आडवे झाले, दाणे भरलेच नाहीत. मिरचीचे पीक रोगाला बळी पडले. अद्रक पिकासाठी विहिरीत पाणी नाही. सोयाबीन ने ही साहारा दिला नाही.
२. आर्थिक कोंडी: मागील वर्षी पाईपलाईनसाठी मोठा खर्च केला. त्यासाठी नातेवाईक, मित्रपरिवाराकडून उसनवारी, तसेच बचत गटाचे कर्ज घेतले होते. यावर्षी पीक चांगले येऊन सर्व देणी फेडू असा विश्वास होता.
३. ,शासनाच्या घोषणेने आलेली निराशा: बाजारभाव नसल्याने खर्चही निघाला नाही. अशात शासन मदत करेल या आशेवर ते होते. परंतु शासनाने केवळ ५,००० रुपयांची मदत जाहीर केल्याने “आता यापुढे मदत मिळणार नाही” या भावनेने त्यांच्या मनात प्रचंड निराशा पसरली. वर्षभराचा उदरनिर्वाह, शेतीचा पुढील खर्च, आणि दोन लहान मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा करायचा? या विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.
स्व. दामोदर यांच्या पश्चात पत्नी आणि दोन लहान लेकरं असून त्यांच्यावर आज आभाळ कोसळले आहे.
आमच्या मागण्या:
१. तलाठी आणि मंडळाधिकारी यांनी तात्काळ घटनास्थळी पंचनामा करून नैसर्गिक आपत्ती आणि कर्जबाजारीपणामुळे झालेली आत्महत्या असा स्पष्ट अहवाल शासनाला सादर करावा.
२. शासनाच्या शेतकरी आत्महत्या मदत योजनेअंतर्गत या कुटुंबाला तात्काळ 5 लाख रुपयांची अंतरिम मदत आणि संपूर्ण कर्जमाफी व इतर शासकीय मदत जाहीर करावी.
३. मृताच्या पत्नीला शासकीय योजनेतून रोजगार आणि मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी शासनाने घ्यावी.
४. शेतकऱ्यांना ५,००० सारखी तुटपुंजी मदत देऊन त्यांची थट्टा थांबवावी. मदत द्यायची असेल तर सन्मानजनक द्या, अन्यथा स्पष्टपणे “देणार नाही” असे सांगा, पण शेतकऱ्याला आशेवर ठेवून निराशेच्या खाईत लोटू नका.

ही केवळ एका शेतकऱ्याची आत्महत्या नाही, तर व्यवस्थेने घेतलेला बळी आहे. शासनाने याकडे गांभीर्याने पाहून तात्काळ कारवाई करावी, अन्यथा करजगाव येथील सर्व शेतकरी तीव्र आंदोलन करतील.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 0 4 7 0
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे