धर्म माणसाला जोडायला शिकवतो; प्रा. वाजेद अली खान यांचे प्रतिपादन
टेंभुर्णीत जमात-ए-इस्लामी हिंदच्या वतीने प्रेषित परिचय कार्यक्रम; मानवतेचा विचार आचरणात आणण्याचे आवाहन

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.2
माणूस आज धर्माच्या नावावर भांडत आहे, पण धर्म माणसाला भांडायला शिकवत नाही तर जोडायला शिकवतो. प्रत्येक माणसाने धर्माचे आचार आपल्या जीवनात उतरवले तरच तो खरा धार्मिक होईल, असे प्रतिपादन प्रा. वाजेद अली खान यांनी व्यक्त केले.
जमात-ए-इस्लामी हिंद, टेंभुर्णी सर्कलच्या वतीने रविवारी सायंकाळी आयोजित प्रेषित मुहम्मद परिचय – मानवतेसाठी एक आदर्श
या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी शालेय विद्यार्थी आशिल सिद्दीकी याने प्रेषित मुहम्मद यांच्या जीवनावर नात सादर केले.
प्रा. खान म्हणाले की, हजरत मुहम्मद यांचा जन्म अशा काळात झाला जेव्हा संपूर्ण अरबस्तान अंधारात बुडाले होते. व्याज, दारू, जुगार, मुलींना जिवंत पुरणे, गुलामांचा व्यापार हे सर्वसामान्य होते. अशा काळात त्यांनी क्रांती केली. एका ईश्वराची उपासना करा आणि सर्व माणसे समान आहेत, असा संदेश त्यांनी दिला. त्यांनी
यशवंत
आयुष्यात कधीही स्वतःसाठी सूड घेतला नाही, तर ज्यांनी त्यांना दगड मारले त्यांच्यासाठीही दुआ केली. शेजारी उपाशी असेल तर तुम्ही पोटभर जेवू नका आणि कामगाराचा घाम
कार्यम जमाल ए इस्ता हिंद
सुकण्यापूर्वी त्याची मजुरी द्या, हा त्यांचा संदेश आजही तेवढाच महत्त्वाचा आहे. आज तरुणांमध्ये वाढती व्यसनाधीनता, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कौटुंबिक वाद या समस्यांचे मूळ माणूस
धर्मापासून दूर गेला आहे यातच आहे. कुराण आणि प्रेषितांची शिकवण जर शाळा, महाविद्यालयांमध्ये शिकवली तर गुन्हेगारी आपोआप कमी होईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी कुराणातील वचनाचा दाखला देत प्रेषितांना संपूर्ण जगासाठी रहमत (दया) बनवून पाठवल्याचे स्पष्ट केले. या कार्यक्रमात प्रेषितांच्या जीवनावरील पुस्तकांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. तसेच उपस्थितांना मराठी व हिंदी भाषेतील साहित्य भेट म्हणून देण्यात आले. विचार मंचावर माजी जिल्हा परिषद
सदस्य शालीकराम म्हस्के, रामधन कळंबे, माजी सुभेदार प्रभू वाघमारे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पी. जी. तांबेकर, सामाजिक कार्यकर्ते रघुराम उखर्डे, शिवसेनेचे जनार्दन झोरे, भिकनखाँ पठाण, फैसल चाऊस, मौलाना अशरफ, मुमताज अली खान, मुमताज अ इंद्रीस खान आणि माजी सरपंच लक्ष्मण शिंदे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जमात-ए-इस्लामी हिंदचे कार्यकर्ते नसीम शेख, साबेर शेख, फकरू कुरेशी, शकील तडवी, खालेद सिद्दीकी आणि शेख अल्लताप यांनी परिश्रम घेतले.




