वीर वाजेकर महाविद्याल फुंडे चा अथर्व गाताडी भारतीय नौसेनेत अग्निवीर म्हणून निवड.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.17
रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, महालण विभाग, फुंडे, ता. उरण येथील “रयत स्पर्धा परीक्षा अकॅडमी” मधील विद्यार्थी अथर्व रवींद्र गाताडी यांची भारतीय नौसेनेत अग्निवीर पदावर निवड झाली आहे. रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य तथा माजी खासदार रामशेठ ठाकूर, रायगड विभाग व महाविद्यालय विकास समिती चेअरमन बाळाराम पाटील,रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पी. जे. पाटील , नगराध्यक्ष भावनाताई घाणेकर, सुधीर घरत सर्व शिक्षक-शिक्षकेतर सेवक, माजी विद्यार्थी संघ तसेच प्राचार्य डॉ. अमोद ठक्कर संचालक डॉ. चिंतामण धिंदळे आणि ,डॉ.संदीप घोडके,उपप्राचार्य व सर्व विद्यार्थ्यांनी अथर्व गाताडी यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. रयत स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्रातून अधिकाधिक विद्यार्थ्यांनी संरक्षण दलात सामील होण्यासाठी असेच परिश्रम घ्यावेत, असे आवाहन पदाधिकारी मान्यवरांनी केले आहे.या यशाबद्दल महाविद्यालय परिसरात आनंदाचे वातावरण असून विद्यार्थी, प्राध्यापक व माजी विद्यार्थ्यांकडून त्यांचे कौतुक होत आहे.अथर्व गाताडी यांनी रयत स्पर्धा परीक्षा अकॅडमीत घेतलेल्या मार्गदर्शन व प्रशिक्षणाच्या जोरावर नौसेना भरती प्रक्रियेतील शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा आणि वैद्यकीय चाचणी यशस्वीरीत्या पार करून अग्निवीर म्हणून निवड मिळवली. देशसेवेची संधी मिळाल्याने त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले आहे. रयत स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व संरक्षण दल भरतीचे मोफत मार्गदर्शन दिले जाते. अथर्व गाताडी यांच्या यशामुळे परिसरातील इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार आहे.




