pub-7425537887339079
ब्रेकिंग

कर्मयोगी संत सावता माळी — संजय राऊत

0 4 7 9 9 4
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.11

कांदा मुळा भाजी, अवघी विठाबाई माझी या अभंगाद्वारे पांडुरंगाच्या भक्तीसाठी सतत चिंतन म्हणून करत आपल्या कर्मातच भगवंत शोधणाऱ्या संत सावता महाराज यांचे कार्य अलौकिक आहे.
आहे जीवनात कर्तव्य कर्म करीत असतानाच कायावाचे मने ईश्वरभक्ती करता येते हा सर्वांना अधिकार आहे अशी शिकवण श्री संत सावता माळी यांच्या कर्मातून दिसून येते.
संत सावता माळी यांचा जन्म 1250 मध्ये सोलापूर जिल्ह्यातील आरणी या गावी झाला. पंढरीच्या पांडुरंगाची सेवा करणाऱ्या दैव माळी यांच्या कुटुंबात सावता माळी यांचा जन्म झाला देव माळी यांना परसोबा व डोंगरोबा अशी दोन मुले होती परसोबा हे लहानपणापासूनच धार्मिक वळण्याचे होते शेतीचा व्यवसाय सांभाळून ते भजन पूजन करीत असत नियमित पंढरीची वारी कधीही ते चुकवत नसत त्यांचा विवाह त्याच पंचक्रोशीतील सदू माळी यांच्या मुलीशी झाला या दांपत्याच्या पोटी सावता माळी यांचा जन्म झाला त्यांचे घराण्याचे मुळगाव मिरज संस्थानातील अवसे होय परंतु सावता माळी यांच्या आजोबा दैव माळी हे आराणी या गावी स्थायिक झाले होते.
संत नामदेव महाराज सावता माळी यांच्या कार्यकर्तृत्वाचे वर्णन करताना म्हणतात
धन्य ते आरण रत्नाची ती खान
जन्मला निधान सावता तो
सावता अगर प्रेमाचा सागर
घेतला अवतार माळी या घरी..
अशा 12 व्या शतकातील संत सावता महाराजांचे कार्य अलौकिक आहे सावता महाराजांचे लग्न भेंडे गावचे भानवसे रूप माळी या घराण्यातील जनाई नावाच्या मुलीशी झाले होते जनाईने सावता बाबाचा उत्तमरीत्या संसार केला विठ्ठल आणि नागाताई अशी या दाम्पत्यांना दोन मुले झाली.
दरम्यान शेती व्यवसायात कल्याण राहणाऱ्या सावतोबांनी कायम पांडुरंगाचे मनान चिंतन केले
न लगे सायास, न पडे संकट
नामे सोपी वाट वैकुंठाची
अशी त्यांची धारणा असल्याने ते कायम आपल्या कर्मातच भगवंताला शोधत होते. सावता माळी हे कर्तव्य आणि कर्म करीत राहणे हीच खरी ईश्वर सेवा अशा प्रवृत्ती मार्गे शिकवण देणारे संत आहेत वारकरी संप्रदायातील संत शिरोमणी म्हणून त्यांचा लौकिक आहे पंढरपूरचे विठ्ठल त्यांचे परमदैवत असले तरी ते प्रत्यक्ष कधी पंढरपूरला गेले नाहीत प्रत्यक्ष पांडुरंग त्यांना भेटावयास त्यांच्या मळ्यात आले असल्याने ते कर्मयोगी संत होते यामुळे आजही पंढरपूरच्या विठ्ठलाची पालखी वर्षातून एकदा खास त्यांना आरणगावी भेटावयास येते.

अनासक्त वृत्तीने ईश्वरा अर्पण बुद्धीने केलेला प्रपंच परमार्थ होतो हीच त्यांची जीवन निष्ठा होती त्यांना मोक्ष मुक्ती नको होती. वैकुंठाचा देव अनुयाकीर्तने या वृत्तेने त्यांनी भगवंताचे निश्चिंत भक्ती केली.

संत सावता माळी यांनी नियमित करुणा दयाळूपणा आणि सर्व सजीवांच्या या तत्त्वावर आधारित शिकवण समाजाला दिली आपल्या निस्वार्थ कृती आणि स्वामी निसर्गातच समाधान शोधण्यासाठी त्यांनी साध्या साध्या गोष्टींमध्ये अध्यात्म शोधण्यासाठी तत्कालीन लोकांना प्रेरित केले. परंतु त्या काळी ही त्यांना समाजाने मोठा त्रास दिला. त्यांच्या शेतातील विहीर बुजवून टाकली.

कांदा मुळा भाजी
अवघी विठाबाई माझी
लसूण मिरची कोथिंबीर
अवघा झाला माझा हरी

या अभंगाद्वारे संत सावता माळी यांनी शेतातील प्रत्येक पिकांमध्ये भगवंताचे रूप पाहिले जळी स्थळी काष्टी पाशाने भगवंत सामावलेला आहे हेच सावता माळी यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले त्यांनी जनसामान्यांना आत्मवृत्तेचा मार्ग दाखविला सावता माळी यांना केवळ 45 वर्षाच्या आयुष्य लाभले समरसता आणि अलिप्तता यातील विलक्षण समतोल त्यांच्या व्यक्तिमत्त्वात प्रकाशना जाणवतो त्यांचे केवळ 37 अभंग सद्यस्थितीत उपलब्ध आहेत अशा या थोर संत
कारण येथे आषाढ वैद्य चतुर्दशी शके बाराशे 17 मध्ये 12 जुलै १२९५ रोजी अनंतात विलीन झाले.

ईश्वराचे अंतकरणपूर्वक चिंतन
संत सावता माळी यांनी जनसामान्यांना अध्यात्म आणि भक्ती आत्मबोध आणि लोकसंग्रह कर्तव्य आणि सदाचार याची बेमालून सांगड घालून दिली धर्मचरणातील अंधश्रद्धा करमटपणा जांभिकता व बाह्य औंडंबर याबाबत त्यांनी कोणाचीच भिरभाई ठेवली नाही त्यावर सतत कोरडे ओढले अंतशुद्धी तत्त्वचिंतन सदाचार निर्भयता नीतिमत्ता सहिष्णुता या गुणांची त्यांनी कायम पाठराखण केली ईश्वरांचा प्रसन्न करून घ्यायचे असेल तर योग या जप्त तीर्थवृत्त वृत्तवैकल्य या साधनांची बिलकल आवश्यकता नाही असे त्यांचे ठाम मत होते ईश्वर प्राप्तीसाठी फक्त अंतकरणपूर्वक चिंतन हवे आहे असे ते सांगत
म्हणूनच त्यांचे परमशिष् काशीबा यांनी
सावता बाबांनी केलेल्या अभंगाची रचना लिखित केली आहे
स्वकर्मात व्हावे रत
मोक्ष मिळे हातोहात
सावत्या ने केला मळा
विठ्ठल देखील डोळा असे लिहून ठेवले आहे.

दरम्यान पंढरीचा पांडुरंग सावतोबाच्या मळ्यात येऊन माझ्यामागे चोर लागले आहेत मला कुठेतरी लपवू असे सांगत असताना प्रत्यक्ष पंढरीच्या पांडुरंगाला हृदयात साठवण्याची किमया संत सावता बाबा यांनी केले. संत नामदेव महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज हे पांडुरंगाला शोधत संत सावता महाराज यांच्या मळ्यात आले . संत सावता महाराजांनी पंढरीच्या पांडुरंगाला हृदयात साठविले. यावरून संत सावता माळी व पांडुरंग यांचे किती जवळचे संबंध होते हे दिसून येते.

अशा या कर्मयोगी संताची महाराष्ट्रभर समाधी संजीवन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
प्रपंचची असुनी परमार्थ साधावा
वाचे आठवावा पांडुरंग
उच नीच काही न पाहे सर्वथा
पुराणींच्या कथा पुराणीच
आपल्या कामातच परमेश्वर पाहणाऱ्या संत सावता महाराजांनी अभंगाद्वारे पुराणातील कथांवर प्रखरपणे टीका करत भगवंत भक्तीसाठी कोणी उंच नीच नाही भगवंताच्या समोर सर्व समान आहेत ही भूमिका 12 व्या शतकात मांडली.
काम हेच परमेश्वर अशी दृढ श्रद्धा बाळगणारे व परमार्थाचा उपदेश करणारे सावता माळी त्यांच्या काळात महाराष्ट्राच्या भक्तीच्या मळ्याची मनोभावे जपवणूक करीत होते. अशा या संत विचाराची आजही समाजाला गरज असून त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने संतांच्या विचारावर समाजाला चालण्याची गरज आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 7 9 9 4
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे