pub-7425537887339079
ब्रेकिंग

अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीविरुद्ध पो. ठाणे टेंभुर्णी येथे पोक्सो (POCSO) व बीएनएस कायद्यान्वये गंभीर गुन्हा दाखल.

0 4 9 7 3 3
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.27

तात्काळ कारवाई सुरू.
पोलीस ठाणे टेंभुर्णी हद्दीतील एका गावात अल्पवयीन बालिकेवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी संशयित आरोपीविरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (POCSO Act) तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) च्या विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटना थोडक्यात:
कुंभारझरी (ता. जाफ्राबाद) येथील एका १५ वर्षीय अल्पवयीन बालिकेला लग्नाचे आमिष दाखवून, गावातील संशयित इसम नामे अक्षय रविंद्र शिंगणे (वय ३० वर्ष, रा. कुंभारझरी) याने तिच्या मनाविरुद्ध वारंवार लैंगिक अत्याचार केले. या अत्याचारातून पीडित बालिका गर्भवती राहिली होती. पीडितेस प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता तिची प्रसूती झाली.
या संदर्भात पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पो. ठाणे टेंभुर्णी येथे गु.र.नं. १९४/२०२६, कलम ६४(२)(m), ६५ भारतीय न्याय संहिता (BNS) सह कलम ४, ६ (सह ५(j)(ii), ५(l)), १२ बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (POCSO Act) २०१२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपास व कायदेशीर कारवाई:
सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ तपास हाती घेण्यात आला आहे. पीडिता व नवजात बाळावर वैद्यकीय देखरेखीखाली उपचार सुरू असून, फॉरेन्सिक पुराव्यांची शास्त्रोक्त तपासणी, साक्षीदारांचे जबाब व आरोपीविरुद्ध आवश्यक ती कायदेशीर कारवाई जलद गतीने राबवण्यात येत आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बी. एस. खर्डे करत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 9 7 3 3
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे