pub-7425537887339079
ब्रेकिंग

टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे अत्यंत कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक अधिकारी श्री. संजय देशपांडे यांना पदोन्नतीची भेट

0 4 4 9 7 6
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.14

जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथे कार्यरत असणाऱ्या श्री. देशपांडे यांच्या उत्कृष्ट सेवेची दखल घेत, त्यांची (ASI) या महत्त्वपूर्ण आणि जबाबदारीच्या पदावर पदोन्नती करण्यात आली आहे.श्री. देशपांडे यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत आणि विशेषतः टेंभुर्णी पोलीस स्टेशन अंतर्गत भागात अत्यंत निष्ठेने व पारदर्शकपणे कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम केले आहे. त्यांच्या याच खडतर परिश्रमाचे आणि खाकी वर्दीप्रती असलेल्या निष्ठेचे फलित म्हणून त्यांना ही पदोन्नती मिळाली असून पोलीस वर्तुळातून व जाफराबाद परिसरातील नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.पोलीस ठाण्यात त्यांचा सत्कार करण्यात आला आनंदाच्या प्रसंगी टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री. अविनाश राठोड आणि पोलीस उपनिरीक्षक श्री. बाबासाहेब खार्डे यांनी सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत श्री. संजय देशपांडे यांचा पुष्पगुच्छ देऊन व पेढे भरवून जंगी सत्कार केला. यावेळी पोलीस निरीक्षक राठोड व उपनिरीक्षक खार्डे यांनी देशपांडे यांच्या कामाचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी पोलीस ठाण्यातील सर्व अंमलदार व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.नवीन पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर श्री. संजय देशपांडे यांनी पोलीस निरीक्षक अविनाश राठोड, पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब खार्डे, सर्व सहकारी कर्मचारी आणि हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच, “वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जनतेची सेवा अधिक तत्परतेने आणि जोमाने करण्यासाठी मी कटिबद्ध राहीन,” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

—————————————————————

आपल्या सेवेमध्ये कर्तव्यनिष्ठता आणि प्रामाणिकपणा असेल, सेवेमध्ये काम करण्याचे सातत्य असेल, सर या कामासाठी सेवेमध्ये पदोन्नती दिल्या जाते नियमित पदोन्नती ज्यांची निवड होते. या ठिकाणी सचोटी आणि कर्तव्य निष्ठता आता कामाला येते. श्री देशपांडे यांना त्यांच्या या निष्ठेचे फळ मिळाले आहे. …………….. सपोनी अविनाश

——————————————————————-

पोलीस दलात काम करताना जनतेचे रक्षण करणे आणि कायदा-सुव्यवस्था टिकवणे हे आपले पहिले कर्तव्य असते. या नवीन पदाच्या माध्यमातून मला अधिक जबाबदारीने काम करण्याची संधी मिळाली आहे. मी तुम्हाला ग्वाही देतो की, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व सहकाऱ्यांच्या साथीने, टेंभुर्णी परिसरातील नागरिकांची सेवा मी अधिक तत्परतेने, प्रामाणिकपणे आणि जोमाने करत राहीन. ..सजय देशपांडे सहाय्यक पोलीस निरीक्षक टेंभुर्णी (ASI)..

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 4 9 7 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे