अंबड येथे संत सावता माळी भक्तजनांच्या वतीने दिंडी सोहळ्याचे यशस्वी आयोजन
सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा जाधव यांच्याकडून संत सावता माळी मंदिरात कपाट व घंटा अर्पण

अंबड/प्रतिनिधी,दि.28
आषाढी एकादशी निमित्त अंबड येथील संत शिरोमणी सावता माळी मंदिर, माळी गल्ली येथून भक्तजनांच्या वतीने भक्तिमय वातावरणात अंबड शहरात दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. लक्षवेधी विठ्ठल रुक्माई देखाव्याचे जागोजागी स्वागत करण्यात करण्यात आले. पारंपरिक वारकरी वेशभूषेत सावता माळी भक्तजन या दिंडीत मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.तुळशी इंद्रायणी डोक्यावर घेत, फुगडी खेळत, टाळ मृदुंगाच्या निनादात,विठ्ठलाच्या नामस्मरणात संपन्न झालेल्या या दिंडी सोहळ्याचे अंबड शहरवासीयांचे लक्ष वेधले.
आषाढी एकादशीच्या पावन पवित्र दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा जाधव यांच्या वतीने श्री संत सावता माळी मंदिरास दहा किलोची घंटा व कार्यालयीन कामकाजासाठी लोखंडी कपाट दान स्वरूपात देण्यात आले त्यांच्या या कार्यामुळे सुरेखा जाधव यांची सर्वत्र अभिनंदन व कौतुक केले जात आहे.



