pub-7425537887339079
ब्रेकिंग

महसुल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे; विविध प्रकल्पास भेट व कार्यालयांची पाहणी

0 4 3 8 6 9
[sp_wpcarousel id="1375"]

 जालना/प्रतिनिधी,दि.29

ज्याचे अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे हे आज (दि. 29 मे) जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता, त्यांनी आज विविध विकास प्रकल्प आणि शासकीय कार्यालयास प्रत्यक्ष भेट देवून कामांची पाहणी केली. अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांच्या दौऱ्याची सुरुवात दरेगाव (ता. जालना) येथील ड्रायपोर्ट प्रकल्पाच्या पाहणीने झाली. या प्रकल्पाची सद्यस्थिती, उपलब्ध सुविधा तसेच भविष्यातील नियोजनाबाबत त्यांनी अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. प्रकल्पाच्या कामांमध्ये गती आणण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. त्यानंतर त्यांनी जालना शहरातील मोतीबाग चौपाटी येथे सुरू असलेल्या सुशोभिकरण कामांची पाहणी केली. कामाची गुणवत्ता, प्रगती आणि नागरिकांसाठी निर्माण करण्यात येणाऱ्या सुविधांचा त्यांनी आढावा घेतला. शहर सौंदर्यीकरणाच्या कामांमध्ये दर्जा राखण्याबाबत त्यांनी संबंधित यंत्रणेला सूचना केल्या. यानंतर जालना येथील सिरसवाडी रोडवरील जिल्हा रेशीम कोष बाजारपेठेस भेट देऊन बाजारपेठेतील सुविधा आणि कार्यपद्धतीची माहिती घेतली. तसेच यावेळी त्यांनी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, सह दुय्यम निबंधक कार्यालयास, उपविभागीय अधिकारी कार्यालय, जालना तहसिल कार्यालय, जालना, आपले सरकार सेवा केंद्र तहसिल कार्यालय, जालना येथे भेट देऊन येथील उपलब्ध सोयी सुविधांची पाहणी केली. तसेच संबंधीत कर्मचाऱ्यांशी संवाद साधुन नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या सेवांची देखील माहिती घेतली. तसेच त्यांनी बदनापुर येथील कृषी विज्ञान/संशोधन केंद्रास भेट दिली. कार्यालयीन कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्याच्या सूचना नी अधिकाऱ्यांना दिल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 8 6 9
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे