pub-7425537887339079
ब्रेकिंग

संजीवनी इंग्लिश स्कूल टेंभुर्णी येथे स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा

0 4 7 9 9 0
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.16

टेंभूर्णी ता. जाफराबाद येथील संजीवनी इंग्लिश स्कूल येथे स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा श्री दत्ताजीराव देशमुख सर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार श्री अशपाक सर,श्री गंगाराम धनवई ,श्री सांडू उखर्डे,श्री भाऊसाहेब देशमुख,श्री सचिन वाघ,श्री बाबासाहेब डोमाळे, श्री दुर्गादास देशमुख,श्री लक्ष्मन उखर्डे, सौ पूजा वाघ,सौ आरती वाघ, श्री बालाजी काठोळे ,सौ दगडाबाई काठोळे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन व द्वीप प्रज्वलन करून करण्यात आली. ध्वजपूजण श्री नितीन काळे व सौ सुजाता काळे यांच्या हस्ते करण्यात आले तर ध्वजारोहण प्रा श्री दत्ताजीराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यामध्ये श्रद्धा उखर्डे,आयुष खोत, आरुष धनवई, देवांश बकाल, अन्वी काठोळे, श्रीशा मुकुटराव या विद्यार्थ्यांचा समावेश होता.अध्यक्षीय भाषणामध्ये विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य सेनानीचे गुण आपण अंगीकारणे व आपल्या देशाला प्रगतीपथावर नेण्याचा विद्यार्थ्यांना सल्ला देण्यात आला. त्यानंतर गावांमधून प्रभातफेरी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या वेशभूषेचे सर्व गावातून कौतुक होत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली पंडित मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेचे प्राचार्य प्रा सतीश जाधव सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाग्यश्री जाधव मॅडम,वैष्णवी उखर्डे मॅडम,हिना शेख मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले. सर्वात शेवटी प्रा श्री दत्ताजीराव देशमुख यांच्याकडून विद्यार्थ्यांना खाऊ ( बिस्कीट पुढे) देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 7 9 9 0
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे