pub-7425537887339079
ब्रेकिंग

भोकरदन येथील शासकीय मुलींच्या वस्तीगृहात निकृष्ट जेवणामुळे 5-6 विद्यार्थिनींना विषबाधा – मेस ठेका रद्द करा, कंपनीला काळ्या यादीत टाका – बोरशे गुरुजी

0 4 7 9 9 4
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.11

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय मुलींचे वस्तीगृह, भोकरदन येथे D.M.K. Enterprises JV With Solution Pvt. Ltd. या ठेका कंपनीद्वारे पुरविल्या जाणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या जेवणामुळे दि. 05/08/2026 रोजी 5 ते 6 विद्यार्थिनींना विषबाधा होऊन त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. आम आदमी पार्टी, जालना गेल्या 1 वर्षापासून या वस्तीगृहातील निकृष्ट जेवण आणि गैरव्यवस्थापनाबत सातत्याने पाठपुरावा करीत आहे. यापूर्वीही अशा तक्रारी होऊनही केवळ औपचारिक कारवाई झाल्याने पुन्हा विद्यार्थिनींच्या जीवाशी खेळ सुरू आहे.
आम आदमी पार्टीच्या प्रमुख मागण्या:
1. वस्तीगृहाचा मेस ठेका तातडीने रद्द करावा.
2. D.M.K. Enterprises JV With Solution Pvt. Ltd. कंपनीला शासकीय कामातून काळ्या यादीत टाकावे.
3. दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई करावी.
4. विषबाधा झालेल्या विद्यार्थिनींना शासकीय उपचारासह प्रत्येकी ₹50,000 नुकसानभरपाई द्यावी.
5. अन्नधान्य व शिल्लक अन्नाचे सॅम्पल FSSAI लॅबमध्ये तपासावेत.
6. निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती नेमावी.
7. वस्तीगृहात CCTV, बायोमेट्रिक व तक्रारपेटी सुरू करावी.
इशारा
दि. 20/08/2026 पर्यंत वरील मागण्यांची अंमलबजावणी न झाल्यास आम आदमी पार्टी तर्फे पीडित विद्यार्थिनी व पालकांसह दि. 25/08/2026 रोजी सकाळी 10 वाजता भोकरदन येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल.
या प्रकरणाची तक्रार मा. जिल्हाधिकारी जालना, जिल्हा अन्न व औषध प्रशासन अधिकारी जालना उपविभागीय अधिकारी भोकरदन यांच्यामार्फत आज दाखल करण्यात आली आहे.
निवेदनावर खालील पदाधिकार्‍यांच्या स्वाक्षरी असुन निवेदन देतांना ते हजर होते.
बोरसे गुरुजी – जिल्हा सचिव महजादखान – जिल्हा उपाध्यक्ष फारुक भाई – शहर उपाध्यक्ष भगवान पालकर – कार्यकारणी सदस्य

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 7 9 9 4
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे