pub-7425537887339079
ब्रेकिंग

टेंभुर्णी येथील योगेश कुमकर यांचा स्तुत्य उपक्रम; गेल्या ४ वर्षांपासून रोज घरासमोर चिमण्यांसाठी टाकतात दाणे

0 4 7 9 9 4
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.13

आजच्या धावपळीच्या युगात माणसाचे निसर्गाकडे दुर्लक्ष होत असताना, जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील योगेश कुमकर यांनी मात्र निसर्गाशी आणि मुक्या पक्षांशी असलेले आपले नाते घट्ट जपले आहे. योगेश कुमकर हे गेल्या ४ वर्षांपासून दररोज न चुकता आपल्या घरासमोर चिमण्यांसाठी दाणे टाकतात.दररोज सकाळी उजाडताच चिमण्यांची किलबिलाट सुरू होते. योगेशजी घराबाहेर येऊन पक्ष्यांसाठी दाणे आणि पाण्याची सोय करतात. गेल्या ४ वर्षांच्या या सातत्यामुळे आता चिमण्या आणि त्यांच्यात एक अनोखे नाते तयार झाले असून, चिमण्याही रोज सकाळी या मायेच्या घासाची वाट पाहत असतात. योगेशजींनी टाकलेले दाणे टिपण्यासाठी त्यांच्या अंगणात चिमण्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते.या उपक्रमाबद्दल बोलताना योगेश कुमकर सांगतात की, “पक्ष्यांना दाणे टाकल्याने मनाला एक वेगळेच समाधान आणि शांतता मिळते. आपण निसर्गाचे काहीतरी देणे लागतो, याच भावनेतून मी गेल्या ४ वर्षांपासून हे रोज करतो.”आजच्या काळात चिमण्यांची संख्या घटत असताना, टेंभुर्णी येथील योगेश कुमकर यांनी जपलेले हे पक्षीप्रेम खरोखरच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे. त्यांच्या या उपक्रमाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

——————————————————————

गेल्या चार वर्षांपासून रोज सकाळी घरासमोर चिमण्यांना दाणे टाकणे हा आता माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. सुरुवातीला मी सहज म्हणून काही दाणे टाकले होते, पण हळूहळू चिमण्यांची संख्या वाढत गेली आणि आता तर रोज सकाळी त्या माझी वाट पाहत असतात. सकाळी उठल्या उठल्या त्यांचा तो किलबिलाट ऐकला की मनातील सगळा ताणतणाव निघून जातो*.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 7 9 9 4
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे