pub-7425537887339079
ब्रेकिंग

सोनम वांगचुक यांना पाठिंब्यासाठी जाफराबाद तालुका शिवसेनेच्या वतीने धरणे आंदोलन…

0 4 6 3 4 1
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि 17

अयोध्येतील प्रभू श्रीराम यांच्या मंदिरातील चोरी प्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी व नीट परीक्षा पेपर फुटीच्या विरोधात सोनम वांगचुक यांचे दिल्ली येथील जंतर मंतर वर सुरू असलेल्या अन्यायाग उपोषणाला पाठिंबा व शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात यावा या मागणीसाठी जाफ्राबाद येथील हनुमान मंदिरात प्रभू श्रीरामाची आरती करून छत्रपती शिवाजी महाराज चौकात तालुका शिवसेनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनावेळी या सरकारचे करायचे काय,खाली मुंडके वर पाय,धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या,प्रभू श्रीराम मंदिरातील चोरी प्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे यासह शासनाच्या विरोधात विविध प्रकारच्या घोषणा शिवसैनीकडून देण्यात आल्या. यावेळी धरणे आंदोलनाला शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रमेश पा. गव्हाड,परमेश्वर जगताप,तालुका प्रमुख कुंडलिक पा. मुठ्ठे,तालुका युवा अधिकारी मुकेश माकोडे, ज्येष्ठ शिवसैनिक जनार्दन झोरे, चंदू शिंदे, विष्णू लोखंडे,गोविंदा माकोडे,नंदकिशोर भालके,समाधान चव्हाण,पंढरी उगले,विनोद शेळके, गजानन मुळे,दगडू तांबेकर, नागोराव बंगाळे,मोहम्मद फैसल,शेख इरफान, समीर शहा,सलमान पठाण,परमेश्वर सरोदे, बाबुराव मुळे,राजू लोखंडे अशपाक कुरेशी यासह आदी शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते….

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 3 4 1
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे