pub-7425537887339079
ब्रेकिंग

जिजाऊ स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा

विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर सादरीकरणाने रंगला स्वातंत्र्यदिन सोहळा

0 4 8 0 9 5
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.19

जाफराबाद येथील जिजाऊ इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये १५ ऑगस्ट रोजी ८० वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात, जल्लोषात आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळेच्या वतीने ध्वजारोहण, प्रभात फेरी, – लेझीम पथक, देशभक्तीपर गीते, नाटिका – तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे – आयोजन करण्यात आले होते.

– कार्यक्रमाची सुरुवात उत्साहपूर्ण – वातावरणात झाली. संतोष जोडीवाले यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण – करण्यात आले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी – बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान, भारतीय संविधानाचे महत्त्व आणि राष्ट्रनिर्माणामध्ये विद्यार्थ्यांची भूमिका – याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी मन लावून शिक्षण घेऊन जबाबदार नागरिक – बनावे आणि देशाच्या प्रगतीमध्ये आपले योगदान द्यावे, असे आवाहन केले.

विद्यार्थ्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखांनी उपस्थितांचे वेधले लक्ष

कार्यक्रमातील विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी सादर केलेली देशभक्तीपर गीते, नाटिका आणि विविध महापुरुषांच्या व स्वातंत्र्यसैनिकांच्या वेशभूषा. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विविध व्यक्तिरेखांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

या कार्यक्रमाला विठ्ठल सुरवसे, सुदर्शन लोखंडे, सागर जारवाल, भास्कर लोखंडे, सतीश देवरे, गालिब शेख, संतोष जोडीवाले, मोहम्मद रईस शेख, परमेश्वर डुकरे, शंकर लोखंडे, गजानन दिवटे, मयूर भोपळे, नंदकिशोर धबडकर, विद्या लोखंडे, पूजा भुतेकर, दिपाली लोखंडे, अंजना पंडित यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच शाळेचे मुख्याध्यापक योगेश शिंपी यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 0 9 5
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे