pub-7425537887339079
ब्रेकिंग

दिव्यांग यांना इलेक्ट्रिकल बस मध्ये प्रवास सवलत द्या.

चक्का जामचे दिले निवेदन. दिव्यांग साठी प्रहार संघटना आली पुढे.

0 4 7 9 9 4
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.14

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, जाफ्राबाद आगार,जाफ्राबाद, जि.जालना.शिवाई इलेक्ट्रिक बसमध्ये दिव्यांग व्यक्तींना प्रवास सवलत लागू करण्याबाबत तसेच मागणी मान्य न झाल्यास दि. 24/08/2026 रोजी चक्का जाम करू असे निवेदन देऊन महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या शिवाई इलेक्ट्रिक बस सेवेमध्ये दिव्यांग व्यक्तींना प्रवास सवलत मिळत नसल्याने राज्यातील हजारो दिव्यांग नागरिकांवर अन्याय होत आहे. शिक्षण, रोजगार, उपचार व दैनंदिन प्रवासासाठी या बससेवेचा वापर करणाऱ्या दिव्यांगांना मोठा आर्थिक भार सहन करावा लागत आहे.

याबाबत शासनाकडे अनेक वेळा निवेदने देऊनही आजपर्यंत कोणताही सकारात्मक निर्णय झालेला नाही. त्यामुळे दिव्यांगांच्या न्याय्य हक्कासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.दि.24/08/2026 रोजी टेंभुर्णी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे.

प्रमुख मागण्या:
शिवाई इलेक्ट्रिक बसमध्ये दिव्यांग व्यक्तींना तात्काळ प्रवास सवलत लागू करावी.
शासनाकडे हा प्रस्ताव तातडीने पाठवून सकारात्मक शिफारस करावी.
आंदोलनापूर्वी लेखी स्वरूपात योग्य निर्णय कळवावे.
अन्यथा दि. 24/08/2026 रोजी होणाऱ्या आंदोलनास प्रशासनाची उदासीनता कारणीभूत राहील असे निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर सिद्धेश्वर वरगणे प्रहार जिल्हा सचिव जालना,शरद पंडित प्रहार जिल्हा संघटक जालना,सुनिल पंडित प्रहार तालुका अध्यक्ष जाफ्राबाद,भरत सिंग परिहार प्रहार दिव्यांग जिल्हा उपाध्यक्ष जालना,एकनाथ शिंदे प्रहार दिव्यांग अध्यक्ष जाफ्राबाद प्रहार कार्यकर्ते अरुण जंजाळ, मनोहर जंजाळ,माऊली बनकर,दगडु शिंदे,सचिन धारे,नारायण मिसाळ,पंढरी म्हस्के, तान्हाजी पंडित,अमोल शिंदे,अमोल पवार,कृष्णा वाघमारे यांच्या स्वाक्षऱ्या आहे.

फोटो ओळ:निवेदन देता वेळी प्रहार जिल्हा सचिव सिद्धेश्वर व दिव्यांग ता.अध्यक्ष शिवाजी खांडेभराड त्यांच्या वतीने आगार प्रमुखांना निवेदन दिले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 7 9 9 4
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे