pub-7425537887339079
ब्रेकिंग

तृतीयपंथीय बांधवांसोबत दिवाळीचा आनंदोत्सव; गुरुचॅरिटेबल ट्रस्ट आश्रमात भेटवस्तूंचे वाटप

0 5 2 4 2 8
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.6 

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, जालना तसेच राजाराम बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, वसुर आणि सहारा सामाजिक विकास संस्था, चांदई ठोंबरे, ता. भोकरदन, जि. जालना यांच्या संयुक्त विद्यमाने तृतीयपंथीय बांधवांच्या गुरु चॅरिटेबल ट्रस्ट या आश्रमात दिवाळी सणानिमित्त भेट देऊन तृतीयपंथीय बांधवांना भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. दिवाळी हा आनंद, उत्साह, प्रेम आणि सामाजिक एकोप्याचा सण आहे. समाजातील प्रत्येक घटकाला सणाचा आनंद घेता यावा तसेच तृतीयपंथीय बांधवांनाही समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने सहभागी होता यावे, या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी आश्रमातील तृतीयपंथीय बांधवांशी संवाद साधून त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि समाधान हेच या उपक्रमाचे खरे यश असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

या उपक्रमाप्रसंगी सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयातील विशेष अधिकारी (शा.नि.शा) श्रीमती मोदाळे निलेश लक्कस, हरिदास भोपळे व गजानन गवळी. शिवदास कुटे यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थितांनी तृतीयपंथीय बांधवांना भेटवस्तू देऊन त्यांच्यासोबत दिवाळीचा आनंद साजरा केला.

तृतीयपंथीय समाजाला सन्मान, समान संधी व सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत असून, अशा उपक्रमांमुळे समाजात आपुलकी, समता आणि बंधुभावाची भावना अधिक दृढ होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 2 4 2 8
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे