जाफराबाद तालुक्यातील निराधारांना अद्यापही मानधनाची प्रतीक्षाच
जाफराबाद/दत्ता देशमुख,दि 29
४८०० निराधार लाभार्थ्यांचे मानधन मागील तीन महिन्यांपासून रखडले आहे. दरम्यान, वेळोवेळी मागणी करूनही हे मानधन मिळत नसल्याने या निराधारांना मोठ्या आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, रखडलेले मानधन त्वरित अदा करण्याची मागणी टेंभुर्णीसह परिसरातील लाभार्थ्यांनी केली आहे. तालुक्यातील इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेतील अनेक लाभार्थ्यांचे मानधन एप्रिल २०२६ पासून २०२६ एप्रिलपासून लाभार्थ्यांचे मानधन रखडले. रखडले आहे. यापूर्वी या लाभार्थ्यांचे मानधन दरमहा डीबीटीद्वारे त्यांच्या बँक खात्यावर जमा केले जात होते. मात्र, मागील तीन महिन्यांपासून हे मानधन रखडल्याने निराधार लाभार्थ्यांमधून चिंता व्यक्त केली जात अनेक निराधारांना वृद्धापकाळातील औषधोपचारासाठी या मानधनाचा मोठा आधार असतो. मात्र, आहे. मागील तीन महिन्यांपासून या निराधारांना मानधन न मिळाल्याने त्यांना औषधोपचारासह अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या समस्या भेडसावत आहेत. हे खडलेले मानधन त्वरित अदा करण्याची मागणी होत आहे. ______________________________________
तीन महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने तीव्र नाराजी तालुक्यातील इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेतील अनेक लाभार्थ्यांचे मागील तीन महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने त्यांना औषधोपचारासह अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या समस्या भेडसावत आहेत. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ रखडलेले मानधन द्यावे, अशी मागणी होत आहे. यात अनेकजण तालुक्याला जाऊन वारंवार चकरा मारत असल्याचे दिसून येत आहे. _________________________________________
यापूर्वी आम्हाला हे मानधन दरमहा मिळत होते. मात्र, मागील तीन महिन्यांपासून मानधन रखडल्याने मोठ्या आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. आम्हा निराधारांसाठी हे दीड हजार रुपये मानधनच सर्व काही आहे. त्यातूनच कौटुंबिक गरजेसह औषधोपचाराचा खर्च भागवला जातो. मात्र, मानधन रखडल्याने आता दैनंदिन गरजा भागवण्याचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. शासनाने रखडलेले मानधन त्वरित अदा करून आम्हा निराधारांना न्याय द्यावा. जगदीश शर्मा, टेंभुर्णी




