पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम

जालना/प्रतिनिधी,दि.2
राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे या जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहेत.
पालकमंत्री मुंडे यांचे मंगळवार दि. 3 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता वरुडी ता. बदनापूर येथील शिंदे सिल्क इंडस्ट्रीज प्रा.लि. भेट देवून पाहणी करतील. सकाळी 11.00 वाजता जालना शहराकडे आगमन करतील. सकाळी 11.30 वाजता जालना महानगरपालिकेच्या हुतात्मा स्मारक लायब्ररी, टाऊन हॉल लायब्ररी, ग्लो गार्डन व नेहरु उद्यान भूमिपुजन कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी 12.30 वाजता जालना महानगरपालिका कार्यालयाकडे रवाना होतील. दुपारी 12.30 वाजता जालना महापालिका विविध विकास कामांचा व पाणी टंचाई आढावा बैठकीस उपस्थित राहतील. स्थळ- जालना महानगरपालिका सभागृह. दुपारी 1.30 ते 2.20 राखीव दुपारी 2.25 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण करतील. दुपारी 2.30 वाजता जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थिती व पाणी टंचाई आढावा बैठकीस उपस्थित राहतील. दुपारी 3.35 वाजता जिल्हा रेशीम कार्यालयाकडे प्रयाण करतील. दुपारी 3.45 वाजता रेशीम कोष बाजारपेठेला भेट देवून पाहणी करतील. स्थळ जिल्हा रेशीम कार्यालय, जालना तसेच दुपारी 4.20 वाजता परळी वैजनाथ जि. बीडकडे प्रयाण करतील.



