pub-7425537887339079
ब्रेकिंग

शेलघरची किमया भगत दहावीत चमकली! महेंद्रशेठ घरत यांनी केले अभिनंदन!

0 4 3 4 0 7
[sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.13

दिवंगत ज. आ. भगत आणि आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या शेलघर गावची कन्या किमया प्रशांत भगत दहावीत चमकली आहे. तिने गव्हाण-कोपर येथील मोरू नारायण म्हात्रे विद्यालयात इंग्रजी माध्यमात दहावीत ८९.४० टक्के गुण मिळवत घवघवीत यश मिळविले आहे. त्याबद्दल तिचे आणि वडील प्रशांत भगत यांचे कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी पुस्तक भेट देऊन अभिनंदन केले आणि तिला पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी कामगार नेते महेंद्रशेठ घरत म्हणाले, “माझ्या गावची मुले आता विविध क्षेत्रांत चमकत आहेत. शेलघरचा सुनियोजित विकास करण्यात मी अथक परिश्रम केले. आता गावातील मुलांची यशस्वी कामगिरी बघून मनाला समाधान वाटते.”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 4 0 7
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे