रमाई आंबेडकर स्मृतीदिनानिमित्ताने विनम्र अभिवादन

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.29
समर्थ नगर जालना येथील तक्षशिला बहुद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे माता रमाई आंबेडकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला बौद्ध उपासक आणि उपासिका उपस्थीत होत्या.यावेळी पडघन सिस्टर यांनी माता रमाई बदल यांच्या कार्याचा गौरव केला आणि अभिवादन केले.महेंद्र साळवे यांनी रमाई यांच्यावर कविता सादर केली.यानंतर मालती गायकवाड आणि कांबळे मॅडम यांनी पण आपले मनोगत व्यक्त केले.यानंतर काही लोकांनी गाणी गायली, कविता म्हटली.या कार्यक्रमाला तक्षशीला बौधविहार चे अध्यक्ष भिकाजी साळवे उपस्थित होते.याशिवाय या कार्यक्रमास चंद्रकांत वाघमारे,अशोक गंगावणे,सुदाम कांबळे,मीनाताई शरणागत,निर्मला बडोले,ज्योती मगरे,सोनल साळवे,उघडे ताई आणि इतर बौद्ध उपासक उपस्थित होते.




