pub-7425537887339079
ब्रेकिंग

स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही बळीराजाची वाट बिकटच; पानंद रस्त्यांची कामे रखडल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप

जुन्या डावरगाव रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य; शाळकरी मुले, रुग्ण आणि शेतकऱ्यांचे हाल

0 4 5 1 9 7
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.28

स्वातंत्र्याची75 वर्षे पूर्ण झाल्यानंतरही ग्रामीण भागातील बळीराजाची शेतवाट अद्याप बिकटच आहे. आजही पानंद रस्त्यांची कामे न झाल्याने शेकडो शेतकऱ्यांना पावसाळ्यात अक्षरशः चिखल तुडवत शेतात जावे लागते. एकीकडे शासन पानंद रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी विविध योजना जाहीर करत असले, तरी प्रत्यक्षात मात्र या पानंद रस्त्यांची कामे होणार तरी केव्हा, असा आक्रोश शेतकरी करत आहेत. पावसाळ्यात या पानंद रस्त्यांची अतिशय दुरावस्था होत असल्याने शेती करावी तरी कशी, असा प्रश्न टेंभुर्णीसह परिसरातील शेतकऱ्यांना पडला आहे.

टेंभुर्णी येथील जुना डावरगाव रस्ता या पानंद रस्त्यावर तर एकाच पावसात चिखलाची रबडी जमा झाली आहे. वाहनावरून जाणे तर दूरच, मात्र सध्या या रस्त्याने पायी चालणेही अवघड झाले आहे. या रस्त्याच्या पलीकडे कावळे वस्ती म्हणून धनगर समाजाची तीस ते चाळीस घरे वास्तव्यास आहेत. याशिवाय गावातील जवळपास २०० शेतकरी याच वाटेने आपल्या शेतीत ये-जा करत असतात. वस्तीवरील शाळकरी मुलेही याच वाटेने टेंभुर्णी येथे शाळेत येतात. आजारी रुग्णांना देखील याच

———————————————————— ——-
रस्त्यांची दुरवस्था

टेंभुर्णी येथील जुना डावरगाव रस्ता या पानंद रस्त्यासह आणखी शिंदेवस्ती ते जुना पापळ रस्ता, पोलीस कॉलनी ते जुना काचनेरा रस्ता, जुना गणेशपुर रस्ता, पुंजाराम बाबा वस्ती रस्ता, राजुरपाटी ते डव्हळे शेत रस्ता आदी अनेक रस्त्यांची मोठी दुरावस्था झाली आहे. यामुळे पावसाळ्यात शाळकरी मुलांसह शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, अखेर या सर्व पानंद रस्त्यांचे भाग्य उजळणार तरी केव्हा, असा संतप्त सवाल परिसरातील शेतकरी विचारत आहेत.
——————————————————————

जुना डावरगाव पांदण रस्त्यावर जेवरेखा नदीवर पूल हवा टेंभुर्णी ते डावरगाव जुना पांदण रस्ता, दीडशे ते दोनशे शेतकऱ्यांची शेती या रस्त्यावर आहे, तसेच अनेक वस्त्या सुद्धा या रस्त्यांवर आहे. येथील शेतकरी दररोज जाणे न करतात परंतु या रस्त्यावर पूल नाही. जिव रेखा नदी मोठी आहे तिथे पूल असल्याने पावसाळ्यामध्ये येथून रस्ता बंदच असतो. या शेतकऱ्यांची तसेच वस्त्यांवरच्या शाळकरी मुलांची दुरावस्था होते. हा पूल झाला पाहिजे असे अनेक शेतकऱ्यांची मागणी आहे. स्वातंत्र्याच्या प्राप्तीनंतर 75 वर्षानंतरही इथे पूल नाही ही खेदाची बाब आहे. अमोल देशमुख एक शेतकरी. ===============
रस्त्याने रुग्णालयात न्यावे लागते. अशावेळी शाळकरी मुलांसह रुग्ण, शेतकरी व सामान्य जनतेला पावसाळ्यात चिखल तुडवत हा रस्ता पार करावा लागतो. वेळोवेळी मागणी करूनही आतापर्यंत या पानंद रस्त्याचे काम न झाल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आता तरी प्रशासनाने प्राधान्य क्रमाने या पानंद रस्त्याचे कामहाती घ्यावे, अशी मागणी शेतकरी सर्जेराव देशमुख, गबजी जाधव, दत्तात्रय जाधव, शंकर भागवत, दत्ता सुरडकर, विठ्ठल उखर्डे, गजानन उखर्डे, राजधर उखर्डे, प्रभू वाघमारे, सचिन सपकाळ, शंकर उखडें, सारंग उखर्डे, नजीरखा पठाण, मख्खनखा पठाण, आनंद उखर्डे, शालिग्राम धनवई, भानदास धनवई, सचिन मुकुटराव, काशिनाथ सपकाळ,

राजधर उखर्डे, निखिल देशमुख, मंजीराम बोराडे, भागाजी पाचे, लहू माघाडे, हरी सोनसाळे, भगवान सोनसाळे, बाबू कावळे, गणपत भागवत, संतोष बोराडे, सुभाष कळंबे, नारायण उखर्डे, गणेश भागवत, सांडू उखर्डे, ठकसेन उखर्डे, विजय उखर्डे, मनोहर भागवत, दिगंबर भागवत, दगडुबा काठोळे, रामदास धनवई, माधव डोमाळे, भानुदास मघाडे, विनोद उखर्डे, विठ्ठल पाचे, सोनाजी उखर्डे, रामू उखर्डे, विक्रम उखर्डे, अशोक उखर्डे, भगवान कावळे, गणेश कावळे, समाधान कावळे, विष्णू कावळे, अमोल देशमुख, संतोष बोराडे, भाऊसाहेब बोराडे, बाळू माघाडे, विनायक ढवळे यांच्यासह परिसरातील इतर शेतकऱ्यांनी केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 5 1 9 7
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे