pub-7425537887339079
ब्रेकिंग

महसूल विभागाने बोबडे वस्ती शिवारात अवैध वाळू वाहतूक करणारे टिप्पर पकडले

0 4 1 4 9 6
[sp_wpcarousel id="1375"]

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.16

भोकरदन जाफराबाद महसूल विभागाने भोकरदन उपविभागीय अधिकारी बी.सरवनन व जाफराबाद तहसीलदार अविनाश लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या महसूल विभागाच्या टीमने रात्री टेंभुर्णी परिसरातील काळेगाव शिवारामध्ये बोबडे वस्ती शिवार परिसरात अवैध वाळू वाहतूक करणारे दोन टिप्पर पकडण्यात आले. त्यावर कारवाई करण्यात आली. या टीमने हे दोन टिप्पर टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथे कारवाई करून लावण्यात आले. या कामासाठी महसूल विभाग जाफराबाद ची टीम नायब तहसीलदार निवडणूक डी.एस. पेरके यांच्या नेतृत्वातील महसूल अधिकारी रवींद्र वैद्य, किशोर खंडारे, सचिन गुळवे, महसूल सेवक राजू खांडेभराड आदींनी ही सर्व कारवाई केली. पूर्णा काठच्या या परिसरामध्ये अवैध वाहतूक जोरात सुरू असल्याचे महसूल पथकाला कळाले होते. या आधारावर रात्रीच्या गस्तीत त्यांनीही कारवाई केलेली आहे. त्यामुळे अवैध वाळू वाहतूक करणारे यांच्यामध्ये खळबळ उडालेली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 4 9 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे