pub-7425537887339079
ब्रेकिंग

नवभारत शिक्षण संस्थातील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचा सत्कार, शितल गायकवाड गायनॅकॉलॉजिस्ट साठी तर कोमल मुळे बी ए एम एस साठी निवड

शितल गायकवाड गायनॅकॉलॉजिस्ट साठी तर कोमल मुळे बी ए एम एस साठी निवड

0 5 4 6 0 7
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.26

टेंभुर्णी तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथील नवभारत शिक्षण संस्थेच्या शाळेमध्ये व कॉलेजमध्ये शिकलेल्या मुलींनी आपापल्या क्षेत्रामध्ये नावलौक मिळवलेला आहे. कोमल शंकर मुळे याची बी ए एम एस साठी निवड झालेली आहे. तर शितल किशोर गायकवाड या मुलीची एमबीबीएस नंतर पोस्ट ग्रॅज्युएट साठी गायनॅकॉलॉजिस्ट म्हणून निवड झालेली आहे. या दोन्ही मुलींच्या नावलौकिक मिळवलेला असल्याने व नवभारत शिक्षण संस्थेचे नाव उज्वल केलेले असल्यामुळे, या दोन्ही मुलींचे संस्थेचे उपाध्यक्ष शेख जमीर सर, संचालक प्राध्यापक दत्ताजीराव देशमुख टेंभुर्णीकर, व संचालक प्रदीप मुळे यांनी सत्कार केला आहे. प्रसंगी मुलींनी मिळवलेल्या अशाबद्दल उपाध्यक्ष शेख जमीर यांनी या दोन्ही मुलींचे कौतुक केले असून अशीच भरारी आपल्या पुढील आयुष्यामध्ये घ्यावी हा शुभेच्छा ही देण्यात आले आहे. या सत्कार प्रसंगी दोन्ही मुलींनी त्यांच्या आई वडिलांनी व नातेवाईकांनी आनंद व्यक्त केला असून, पुढील शिक्षण हे आनंददायी व्हावे यासाठी संस्थेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आले आहे. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष शेख जमीर सर, प्राध्यापक दत्ताजीराव देशमुख टेंभुर्णीकर, चालक प्रदीप मुळे, एडवोकेट किशोर गायकवाड, बरंडवाल मॅडम, संजय मुळे, शंकर मुळे, व सत्कारमूर्ती कोमल मुळे आणि शितल गायकवाड यांची उपस्थिती होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 6 0 7
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे