pub-7425537887339079
ब्रेकिंग

जाफ्राबाद तालुका जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी ससाने उपाध्यक्षपदी दिलीप खंदारे तर सचिवपदी प्रदीप जाधव यांची निवड; विविध उपक्रमांचे होणार आयोजन

0 4 8 0 9 5
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.6

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त जाफ्राबाद तालुकास्तरीय जयंती उत्सव समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी सुनील ससाने, उपाध्यक्षपदी दिलीप खंदारे, तर सचिवपदी प्रदीप जाधव यांची निवड करण्यात आली आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी आणि जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्रितपणे काम करणार आहेत. समितीच्या वतीने जयंतीनिमित्त गावागावांत प्रभातफेरी, व्याख्यान, साहित्य संमेलन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी दिली. या नव्याने स्थापन झालेल्या समितीचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचे ज्ञानेश्वर पवार, अनिल ससाणे, गजानन ससाणे, ईसुब सौदागर, दिपक जाधव आदींनी अभिनंदन केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 0 9 5
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे