मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम
जालना/प्रतिनिधी,दि.25
मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे हे सोमवार, दि. 28 सप्टेंबर 2026 रोजी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, त्यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
श्री. राणे हे सोमवार, दि. 28 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता मोटारीने (समृद्धी महामार्ग) राजेवाडी तलाव, ता. बदनापूर, जि. जालना येथे प्रयाण करतील. दुपारी 12.30 ते 1.00 वाजता राजेवाडी तलाव येथे आगमन, तलावाची पाहणी तसेच मच्छीमारांसमवेत चर्चा करतील.
दुपारी 1.00 वाजता मोटारीने सोमठाणा तलाव, ता. बदनापूर, जि. जालना येथे प्रयाण करतील. दुपारी 1.15 ते 1.15 वाजता सोमठाणा तलाव येथे आगमन, तलावाची पाहणी तसेच मच्छीमारांसमवेत चर्चा करतील. दुपारी 1.45 वाजता मोटारीने आमदार नारायण कुचे यांच्या संपर्क कार्यालयाकडे, कृषी महाविद्यालयासमोर, बदनापूर, जि. जालना येथे प्रयाण करतील. दुपारी 2.00 ते 3.00 वाजता राखीव. दुपारी 3.00 वाजता मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.




