pub-7425537887339079
ब्रेकिंग

वाहनांच्या वायुप्रदूषण नियंत्रण (पीयूसी) प्रमाणपत्रासाठी सुधारित दर लागू होणार

0 5 3 8 4 7
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.16

वाहनांमधून होणाऱ्या वायुप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहनांच्या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राच्या (PUC) तपासणी शुल्कात सुधारणा करण्यात आली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन आयुक्त कार्यालयाकडून प्राप्त परिपत्रकानुसार सुधारित दर लागू करण्याबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालयाला कळविण्यात आले आहे.

सुधारित दरानुसार दुचाकी वाहनांच्या पीयूसी तपासणीसाठी 60 रुपये, पेट्रोलवरील तीनचाकी वाहनांसाठी 120 रुपये, पेट्रोल, सीएनजी, एलपीजी व इतर संबंधित वाहनांसाठी 150 रुपये, तर डिझेल वाहनांसाठी 180 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. यापूर्वी या वाहनांसाठी अनुक्रमे 50, 100, 125 आणि 150 रुपये शुल्क आकारले जात होते.

वाहनचालकांनी आपल्या वाहनांची नियमित प्रदूषण तपासणी करून वैध पीयूसी प्रमाणपत्र घ्यावे. तसेच सुधारित दरांची माहिती घेऊन अधिकृत पीयूसी केंद्रांवरच तपासणी करून घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जालना यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 8 4 7
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे