pub-7425537887339079
ब्रेकिंग

उरणच्या ८ खेळाडूंची गरुडझेप; महाराष्ट्र आईस हॉकी संघात निवड!

राष्ट्रीय स्पर्धेत करणार राज्याचे प्रतिनिधित्व

0 4 3 8 7 0
[sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.3

औद्योगिक आणि किनारी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उरण तालुक्याच्या क्रीडा इतिहासात एक सुवर्णपान जोडले गेले आहे. उरणमधील तब्बल आठ खेळाडूंनी महाराष्ट्र आईस हॉकी संघात स्थान मिळवून तालुक्याचा नावलौकिक वाढवला आहे. असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी या खेळाडूंची निवड झाली असून, ते उत्तराखंडमधील देहरादून येथे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत. आईस हॉकीसारख्या प्रामुख्याने हिमालयीन प्रदेशात खेळल्या जाणाऱ्या आणि विशेष कौशल्याची गरज असणाऱ्या खेळात उरणसारख्या किनारपट्टीच्या भागातून खेळाडू तयार होणे ही अत्यंत उल्लेखनीय आणि कौतुकास्पद बाब मानली जात आहे. १२ वर्षांखालील गट: वरदा आसरकर, शिवांश तांडेल १५ वर्षांखालील गट: अर्थ सावंत, रुद्र घरत, रेवा पाटील. १८ वर्षांखालील गट: सुरज करण.सीनियर गर्ल्स गट: स्नेहा शेळके, शर्वणी या सर्व विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. या खेळाडूंच्या यशामागे ‘श्री स्केटिंग अकॅडमी’चे संस्थापक व प्रशिक्षक प्रीती पाटील आणि राकेश पाटील यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी घेतलेले अपार परिश्रम, सातत्यपूर्ण तांत्रिक मार्गदर्शन आणि खेळाडूंमध्ये निर्माण केलेली जिद्द यामुळेच उरणच्या खेळाडूंनी ही गरुडझेप घेतली आहे. बर्फावर खेळल्या जाणाऱ्या या अत्यंत वेगवान आणि रोमांचक खेळात शारीरिक तंदुरुस्ती, विवेक संतुलन आणि चपळ निर्णयक्षमतेची गरज असते. महाराष्ट्रात स्केटिंगच्या माध्यमातून या खेळाचा प्रसार वेगाने वाढत आहे. या सर्व खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधी प्रतिनिधित्व करताना उत्कृष्ट कामगिरी करावी आणि उरणच्या क्रीडा इतिहासात मानाचा तुरावा अशी अपेक्षा आणि विश्वस्ताने क्रीडाप्रेमींकडून व्यक्त केला जात आहे .सद्यस्थितीत सर्व खेळाडूंवर सर्वच क्षेत्रातून सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 8 7 0
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे