pub-7425537887339079
ब्रेकिंग

कडापे गावात जलजीवन नळपाणी योजनेचा शुभारंभ.

0 4 3 8 6 9
[sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.1

रविवार दि. ३१/०५/२०२६ रोजी उरण तालुक्यातील कडापे गावात जलजीवन नळपाणी योजनेचा शुभारंभ आठगाव पाणीकमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष व जि.प. सदस्य अविनाश ठाकूर, आठगाव पाणी कमिटीच्या माजी अध्यक्षा आणि वशेणी ग्रा.पं. सरपंच अनामिका म्हात्रे, आवरे ग्रा.पं. सरपंच निराबाई पाटील, हितेंद्र म्हात्रे आणि सर्व आठगाव पाणीकमिटी सदस्य यांच्या प्रयत्नांतून करण्यात आला.ह्यावेळी कडापे पाणीकमिटीचे अध्यक्ष संतोष म्हात्रे, सचिव सरिता प्रशांत म्हात्रे, पाणीकमिटीचे सदस्य, कडापे गावचे ग्रामस्थ आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. अनेक वर्षांच्या प्रतिक्षे नंतर कडापे गावात नळपाणी योजनेचे पाणी आल्याने सर्व ग्रामस्थ व महिला भगिनींच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता. ह्यावेळी कडापे ग्रामस्थांनी सर्व आठगाव पाणीकमिटीचे आभार मानले.तसेच कडापे पाणीपुरवठा कमिटीचे अध्यक्ष संतोष म्हात्रे आणि सर्व सदस्य तसचे कडापे गावातील महिला भगिनी यांच्या अथक प्रयत्नांने कडापे गावातील पाण्याचा गंभीर असलेला प्रश्न सोडविल्याने कडापे ग्रामस्थांच्या वतीने आभार मानत सर्वांचे अभिनंदन करण्यात करण्यात आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार कडापे गावातील आदर्श शिक्षक अशोक म्हात्रे यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 8 6 9
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे