pub-7425537887339079
ब्रेकिंग

पनवेल जेएनपीटी महामार्गावरील उरण मधील चिरले परिसरात अवजड वाहनांच्या विरुद्ध दिशेने होणाऱ्या वाहतूक मुळे होत आहेत अपघात

. विरुद्ध दिशेने वाहने न सोडण्याची सामाजिक कार्यकर्ते अजित म्हात्रे यांची मागणी. त्वरित कारवाई न केल्यास अजित म्हात्रे यांचा आंदोलनाचा इशारा.

0 4 4 0 4 3
[sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.4

पनवेल-जेएनपीटी महामार्गावरील उरण मधील चिरले परिसरात वैष्णो लॉजिस्टिक या आस्थापने अंतर्गत चालणाऱ्या अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात विरुद्ध दिशेने वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. सदर बेकायदेशीर वाहतुकीमुळे परिसरात वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढले असून स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. तसेच विरुद्ध दिशेने धावणाऱ्या अवजड वाहनांमुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे. परिसरातील शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा विशेष त्रास होत आहे.तरी सदर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन वैष्णो लॉजिस्टिक अंतर्गत चालणाऱ्या अवजड वाहनांच्या विरुद्ध दिशेने होणाऱ्या वाहतुकीवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच भविष्यात अशा प्रकारांना आळा बसण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अजित म्हात्रे यांनी वाहतूक विभागाकडे केली आहे. त्वरित कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा अजित म्हात्रे यांनी प्रशासनाला दिला आहे. आज पर्यंत उरण मध्ये बेकायदेशीर व अवैध वाहतूक मुळे अनेक जणांचे विनाकारण मृत्यू झाले आहे. तर काही ठिकाणी अपघात होऊन महत्वाचे हात पाय कायमचे निकामी झाले आहेत. अपघातामुळे अनेकांचे आयुष्य उद्धवस्त झाले आहे. त्यामुळे गोर गरीब जनतेची, नागरिकांची मागणी व त्यांच्या समस्या लक्षात घेता पर्यावरणवादी तथा सामाजिक कार्यकर्ते अजित म्हात्रे यांनी सदर समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. सदर समस्या त्वरित सुटली नाही तर नागरिकांचा मोठा उद्रेक होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच यावर त्वरित कारवाई करण्याची व कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 4 0 4 3
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे