टेंभुर्णीच्या भूमिपुत्राला अजून एक पुरस्कार. दिव्यांग आकाश ला मुंबई येथे पुरस्कार देऊन सन्मान.

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.4
टेंभुर्णी येथील भूमिपुत्र आकाश देशमुख यांना या वर्षीचा “महाराष्ट्र कला व सांस्कृतिक प्रतिष्ठान” व “मराठी इंडी म्युझिक अवॉर्ड्स” २०२६ चा पुरस्कार सोहळा गुरुवार २ एप्रिल रोजी “स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृह”, दादर (प) मुंबई येथे देऊन गौरव करण्यात आला. आकाश यांना जरी चालता येत नाही बोलता येत नाही तरी पण प्रत्येक प्रसंगाचा भाव तो खूप योग्य प्रमाणे हाताळून त्यांचे मांडणी उत्तम करून एक आदर्श कवी झालेले असून या अगोदर त्यांना अनेक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले आहे. पुरस्कार घेता वेळी त्यांचे वडील त्यांचा सोबत होते.
महाराष्ट्रचे माहिती तंत्रज्ञान (IT) आणि सांस्कृतिक कार्य मंत्री मा.श्री आशिष शेलार काही कारणास्तव कार्यक्रमास उपस्थित न राहू शकल्याने मला अजय नाईक सरांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट दिव्यांग कलाकार पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले आहे माझी या पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल अजय नाईक सर व संपूर्ण टीमचे खूप खूप आभार मानून धन्यवाद दिले.
कवी आकाश देशमुख यांना भेटलेल्या या पुरस्कार मुळे तुमचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.




