pub-7425537887339079
ब्रेकिंग

टेंभुर्णीच्या शुभम मुळे चे आमरण उपोषण यशस्वी टेंभुर्णीची ग्रामसभा आता 25 तारखेला घेण्याचे लेखी पत्र, तरुणांच्या उठावाला यश

0 4 8 0 9 5
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि 18

टेंभुर्णी येथे सध्या प्रशासक आहे. मात्र येथील ग्रामपंचायत चे सर्व सामान्य यांची कामे होत नसल्याने आणि ग्रामपंचायत वर असलेल्या तरुणांच्या नाराजी बघता गावातील तरुण मंडळी यांनी विशेष लक्ष्य घालत काही तरुण मंडळी यांनी उपोषण करण्याचे हत्यार पुढे करत ८० वर्षा पूर्वी भारत स्वतंत्र झाला या दिवस १५ ऑगस्ट रोजी येथील तरुण शुभम अंकुश मुळे यांनी आपल्या उपोषणाला सुरवात करत सगळ्याच्या नजरा तिकडे वळविल्या होत्या.त्यांच्या उपोषण ला आज यश प्राप्त झाले असून ग्रामसेवक जगदीश आढाव सरपंच प्रतिनिधी प्रशासक गौतम म्हस्के राष्ट्रवादीचे अध्यक्ष रामधन कळंबे सपोनी अविनाश राठोड सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर उखर्डे पवन झोरे यांच्या सह शेकडो तरुणांच्या साक्षीने हे उपोषण सोडण्यात आले.

यासंदर्भात शुभम मुळे यांना लेखी पत्र देऊन त्यात उलेख केला असून आपणांस कळविण्यात येते की, दि. २५ ऑगस्ट २०२६ रोज मंगळवारला गांधी चौक, भाजी मंडी टेंभुर्णी या ठिकाणी सकाळी १०:०० वाजता प्रशासक सौ. सुमनताई लक्ष्मण म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली ठेवण्यात येईल असे लिहून दिले. करिता हे उपोषण मागे घेण्यात आले.हे पत्र वरिष्ठ कार्यालय यांना ही देण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 0 9 5
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे