pub-7425537887339079
ब्रेकिंग

येथील मुरबा गणपती मंदिराचा वर्धापनदिन भक्तिभावाने उत्साहात साजरा

0 4 3 8 7 0
[sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.1

मोरावे गाव येथील समुद्रात असलेल्या प्रसिद्ध श्री गणपती मंदिराचा वर्धापनदिन सोमवारी (ता. १) मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. सकाळच्या वेळेत गणेशपूजन आणि अभिषेक करण्यात आला. यावेळी गव्हाण-कोपर येथील श्री गुरुकृपा भजन मंडळाच्या गायिका सुप्रिया घरत-ठाकूर यांनी गणेशावर आधारित सुमधुर भजने सादर केली. त्यांना त्यांच्या सहकारी वादकांनी उत्तम साथ दिली. मुरबा गणपती ट्रस्टींनी आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधले होते; परंतु ते आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी जिनिव्हा येथे असल्याने सहभागी होऊ शकले नाहीत. त्यांच्या वतीने एम. जी. ग्रुपचे पदाधिकारी उपस्थित होते. महेंद्रशेठ घरत हे गणेशाचे निस्सीम भक्त असल्याने त्यांनी गणेशभक्तांचा समुद्रातील प्रवास सुखरूप व्हावा म्हणून १५ लाखांच्या दोन पॅसेंजर बोटी मुरबा गणपती देवस्थानला दान केल्या आहेत. त्यामुळे गणेशभक्त अतिशय आनंदाने पॅसेंजर बोटीतून प्रवास करून गणेशाचे दर्शन घेतात, फ्लेमिंगोंचा आनंद घेतात. सध्या कडक उन्हाळ्यामुळे सूर्य आग ओकत असतानाही छप्पर असणाऱ्या पॅसेंजर बोटींमुळे भक्तांचा प्रवास आनंदमयी झाला. त्यामुळे गणेशभक्तांनी महेंद्रशेठ घरत यांचे आभारही मानले. मुरबा गणपती देवस्थानचे ट्रस्टी शरद म्हात्रे, हेमंत पाटील, तेजस म्हात्रे, रितेश म्हात्रे यांनी वर्धापन दिनानिमित्त गणेशभक्तांची जय्यत तयारी केली होती. यावेळी गणेशभक्तांना महेंद्रशेठ घरत यांच्या जन्मोत्सवानिमित्त प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘सुखकर्ता’ विशेषांकाचे वितरण करण्यात आले. तसेच सर्व गणेशभक्तांना महाप्रसाद देण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 8 7 0
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे