pub-7425537887339079
ब्रेकिंग

पुन्हा ट्रॅक्टरची ऊसाने भरलेली ट्रॉली पलटी टे

टेंभुर्णी–कुंभारझरी रस्त्यावर आठ दिवसांत दुसरी घटना; अरुंद रस्ता, खड्डे अन् वाढती वाहतूक ठरतेय अपघातांना निमंत्रण!

0 5 3 8 4 2
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/ दत्ता देशमुख,दि 16

टेंभुर्णी–कुंभारझरी रस्त्यावर अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, आज पुन्हा एकदा पैनगंगा साखर कारखान्याची ऊस वाहतूक करणारी ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी झाल्याची घटना घडली. गेल्या आठ दिवसांत याच मार्गावर ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी होण्याची ही दुसरी घटना आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला.
या मार्गावर अरुंद रस्ता, ठिकठिकाणी पडलेले मोठमोठे खड्डे आणि दिवसेंदिवस वाढणारी अवजड वाहनांची वाहतूक यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. सध्या ऊस गाळप हंगाम सुरू असल्याने पैनगंगा साखर कारखान्याकडे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉली व ट्रकची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू आहे. रस्त्याची अपुरी रुंदी आणि खराब अवस्था यामुळे समोरासमोर वाहने आल्यास वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वीही या मार्गावर ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी होण्याच्या घटना घडल्या आहेत. वारंवार अपघात होऊनही रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रश्न अद्याप कायम आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार माहिती देऊनही केवळ थातूरमातूर डागडुजी केली जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

आणखी किती अपघात झाल्यावर प्रशासन जागे होणार?

टेंभुर्णी–कुंभारझरी हा मराठवाडा आणि विदर्भाला जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावरून दररोज शेकडो टन ऊसासह इतर अवजड वाहनांची वाहतूक होत असताना रस्त्याची अवस्था मात्र अत्यंत दयनीय आहे. आज पुन्हा घडलेल्या घटनेमुळे परिसरातील नागरिक आणि वाहनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने आता तरी गांभीर्याने लक्ष देऊन रस्त्यावरील खड्डे कायमस्वरूपी बुजवावेत, रस्त्याच्या कडेला वाढलेली झाडे-झुडपे हटवावीत आणि रस्त्याच्या रुंदीकरणासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.
अपघातात जीवितहानी झाली नाही म्हणून प्रशासनाने निश्चिंत राहू नये; उद्याचा मोठा अनर्थ टाळण्यासाठी आजच उपाययोजना करणे गरजेचे आहे!

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 8 4 2
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे