जिल्हा स्तरीय कॅरम स्पर्धा उत्साहात संपन्न

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.3
रायगड जिल्हा कॅरम असोसिएशन व ओम साई कॅरम क्लब उरण यांच्या सहयोगाने द्रोणागिरी देवी मंदिर सभागृह करंजा उरण येथे १ व २ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन केले होते स्पर्धेसाठी जिल्ह्यातील ११२ स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेतला होता.स्पर्धेचे उदघाटन रायगड जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश तुळपुळे यांनी केले. स्पर्धेसाठी दोन दिवस जेवणाची व्यवस्था भाजपा शहर अध्यक्ष कौशिक शहा यांनी केली होती. सदर स्पर्धेस उरणच्या नगराध्यक्ष भावनाताई घाणेकर यांनी भेट दिली.स्पर्धेत प्रथम क्रमांक मानव पटेल कामोठे,द्वितीय क्रमांक आशिष देशमाने पनवेल,तृतीय क्रमांक अश्रफ खान पनवेल व चतुर्थ क्रमांक राजेश गोहिल कामोठे यांनी मिळवला.सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रायगड जिल्हा कॅरम असोसिएशनचे पदाधिकारी वैभव वाईगडे, वैभव पेठे, अमित यादव, विराज नाखवा, हरेश नाखवा, तेजस म्हात्रे, नितीन वाघेला, सर्व कॅरम क्लब च्या सभासदांनी प्रयत्न केले.




