जेएनपीए मराठी माध्यम स्कूलच्या रूपाने साई संस्था (ट्रस्ट). शैक्षणिक संकुलाच्या शिरपेचात सन्मानाचा तुरा.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.26
महाराष्ट्रात शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या साई संस्था(ट्रस्ट) डोंबिवली यांच्या शैक्षणिक संकुलाच्या शिरपेचात २०२६-२७ या शैक्षणिक वर्षा पासून जेएनपीए मराठी माध्यम स्कूलच्या रूपाने सन्मानाचा तुरा खोवला गेला आहे.या विद्यालयाचा कारभार आत्ता साई संस्थेच्या हातात आला असल्यामुळे परिसरांतील पालक वर्गात आनंदाचे वातावरण असून उरण परिसरांतून जेएनपीएचे अध्यक्ष,सेक्रेटरी आणि या संस्थेचे अध्यक्ष नरसू पाटील यांच्यावर अभिनंदनाच वर्षाव होत आहे. महाराष्ट्रात शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या साईसंस्था (ट्रस्ट) डोंबिवली या संस्थेच्या वतीने डोंबिवली येथे मराठी, गुजराथी, इंग्रजी माध्यमाच्या बरोबरीने गत वर्षी आणखीन एक स्कूल सुरु केले आहे.ही संस्था गेली १८ वर्षा पेक्षा अधिक काळ कार्यरत आहे,तर रायगड-माणगाव येथे गेली २४ वर्षा पेक्षा अधिक काळ इंग्रजी माध्यमाचे स्कूल कार्यरत आहे,या सर्व शैक्षणिक वर्षात या सर्व विद्यालयाने आपल्या शालांत परीक्षेचा निकाल १०० % टक्के लाऊन निकालाची यशस्वी परंपरा आजही राखून ठेवली आहे.मागील चार वर्षात संस्थेच्या वतीने उरण येथे नगराजशेठ सीबीएसई इंटरनॅशनल स्कूल व बरोबरीने कोल्हापूर गडहिंग्ल्ज येथे इ.बी.गडकरी रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय कार्यरत असून गत वर्षी नरसू पाटील कॉलेज ऑफ फ़िजिओ थेरपी या आणखी एका नवीन वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश या साई संस्थेच्या शैक्षणिक संकुलात झालेला आहे. साई संस्था(ट्रस्ट)ने शैक्षणिक क्षेत्रात उतुंग भरारी घेतली असतानाच या सर्व शैक्षणिक बाबीची देशांतील नंबर वन असणाऱ्या जेएनपीए प्रशासनाने दखल घेत प्रकल्पग्रस्थ असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा सर्वांगीणविकास व्हावा हा उद्दात हेतू विद्यार्थ्यांचे पुढील शैक्षणिक भविष्य लक्षात घेऊन उरण येथील जेएनपीए वसाहत संकुलात असणाऱ्या जेएनपीए विद्यालयाच्या मराठी माध्यमाची धुरा साई संस्थेवर यंदाच्या २०२६-२७ शैक्षणिक वर्षा पासून टाकली आहे.याबाबतची ऑर्डर दि.३० एप्रिल २०२६ रोजी जेएनपीए प्रशासनाने संस्थेचे अध्यक्ष नरसू पाटील यांच्या कडे सपुर्द केली आहे. या संदर्भात साई संस्थेचे (ट्रस्ट)चे अध्यक्ष नरसू पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की मी स्वतः शिक्षक असल्याने मला शैक्षणिक क्षेत्राची चांगली जाण आहे.जेएनपीएचे अध्यक्ष,सेक्रेटरी आणि प्रशासनाने संस्थेवर विश्वास दाखून शिक्षणाची मोठी जबाबदारी माझ्या संस्थेवर सोपविली आहे. तीपूर्ण करण्यास मी व संस्था कटिबद्ध राहून पूर्ण करू, येथील बहुसंख्य विद्यार्थी हे प्रकल्पग्रस्त आहेत त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना पीएपीची सवलत मिळेल,साई संस्थेच्या वतीने चालू शैक्षणिक वर्षात कोणत्याही प्रकारे फी वाढ होणार नाही.विशेष म्हणजे सरकारकडून अनुदान मिळविण्यासाठी जेएनपीए प्रशासनाने संस्थेला परवानगी दिली आहे त्यामुळे शिक्षकांच्या वेतना मध्येही फरक पडेल व सर्व शिक्षक कायम स्वरूपी सुरक्षित राहतील त्याचप्रमाणे सरकारच्या निकषानूसार विध्यार्थ्यानाही मोफत शैक्षणिक सुविधा उपलब्ध होतील,आत्ता आपलाच कुटुंबांतील एक व्यक्ती आपलीच शाळा चालवीत आहे ही पालकांची भावना असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती पासून सुरक्षतेपर्यंतचे प्रश्न सुटले असल्यामुळे पालक वर्गातही आनंदाचे वातावरण आहे. जेएनपीए प्रशासनाने संस्थेवर टाकलेला विश्वास पूर्ण करण्यासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि मी वचन बद्ध राहीन असे साई संस्थेचे(ट्रस्ट)चे अध्यक्ष नरसू पाटील यांनी सांगितले.


