समर्थ माध्यमिक विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम; गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांसह गौरव

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.9
जाफराबाद येथील स्थानिक पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, समर्थ माध्यमिक विद्यालय, जाफराबाद या विद्यालयाने फेब्रुवारी २०२६ मध्ये झालेल्या एसएससी (SSC) बोर्ड परीक्षेच्या निकालात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. विद्यालयाने आपली उज्वल यशाची परंपरा यंदाही कायम राखली असून, यशस्वी विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह विशेष सत्कार करण्यात आला. निकालाची वैशिष्ट्ये यावर्षी विद्यालयाचा सेमी इंग्रजी माध्यमाचा निकाल १००% लागला असून, मराठी माध्यमाचा निकाल ७०% लागला आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शैक्षणिक वर्तुळातून कौतुक होत आहे. विद्यालयातील गुणवंत विद्यार्थी: विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवत यश संपादन केले आहे. गुणवंत विद्यार्थ्यांची नावे आणि टक्केवारी खालीलप्रमाणे आहे. सुमित दादाराव खंडागळे ८१.२०% दिपाली शिवाजी मापारी ७९.४०% राज भागवत सोनवणे ७८.६०% गणेश विष्णू कणखर ७५.२०% सत्कार सोहळा आणि शुभेच्छा या देदीप्यमान यशाबद्दल संस्थेचे सचिव मा. प्रा. डॉ. संजयजी गौतम यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे. “विद्यार्थ्यांनी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केले असून, त्यांच्या पुढील वाटचालीस संस्थेच्या वतीने खूप खूप शुभेच्छा,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनीही उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. पालकांनीही आपल्या पाल्यांच्या यशाबद्दल आणि शाळेच्या दर्जेदार शिक्षणाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.



