pub-7425537887339079
ब्रेकिंग

उरण येथे महिला काँग्रेसतर्फे महागाई विरोधात आंदोलन

0 4 3 8 6 9
[sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.1

केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर यांच्या किमती वाढवल्या आहेत. त्यामुळे महागाई गगनाला भिडली आहे. त्यामुळे सामान्य जनता भरडली जात आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांच्या आदेशानुसार रायगड जिल्हा काँग्रेस महिला अध्यक्षा रेखा घरत यांच्या अध्यक्षतेखाली उरण तालुक्यातील फुंडे पेट्रोल पंपावर रविवारी (ता. ३१) आंदोलन करण्यात आले. यावेळी महिलांनी मोदी सरकारविरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या. सध्याचे भाजप सरकार विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत आहे. नीट पेपर लिक झाल्याने विद्यार्थ्यांच्या भवितव्यावरच टांगती तलवार आहे. त्यामुळे भाजप सरकारचा निषेध करावा तेव्हढा थोडा आहे. आता तरी मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर यांच्या किमती तातडीने कमी कराव्यात आणि जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणीही रायगड जिल्हा महिला काँग्रेसतर्फे यावेळी करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष रेखा घरत, योगसाधना पाटील, अश्रया शिवकर, निर्मला पाटील, सोनाली पाटील, मनीषा पाटील, प्रमिला पाटील, पार्वती पंडित, माला पाटील, वर्षा पाटील आदी महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 8 6 9
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे