pub-7425537887339079
ब्रेकिंग

20 मे 2026 रोजी देशव्यापी केमिस्ट संप; AIOCD चा इशारा — गजानन शेळके पाटील

0 4 3 4 0 7
[sp_wpcarousel id="1375"]

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.16

ऑनलाईन औषधांच्या अवैध विक्रीला व कॉर्पोरेट कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या प्रचंड सवलतींना (Deep Discounting) विरोध दर्शवण्यासाठी ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट (AIOCD) ने मंगळवार, 20 मे 2026 रोजी देशव्यापी एकदिवसीय संपाची हाक दिली आहे. संपाचे कारण: AIOCD च्या म्हणण्यानुसार, ई-फार्मसी कंपन्यांकडून नियमांचे उल्लंघन करून डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे विकली जात आहेत. यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून बनावट व निकृष्ट दर्जाची औषधे बाजारात येत आहेत. तसेच, मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या Deep Discounting मुळे लहान-मध्यम केमिस्टचे आर्थिक अस्तित्व धोक्यात आले आहे. केमिस्टांच्या प्रमुख 3 मागण्या: ऑनलाईन औषध विक्रीवर तत्काळ पूर्ण बंदी आणावी. कॉर्पोरेट कंपन्यांच्या अति सवलतींवर नियंत्रण आणून समान स्पर्धेचे वातावरण निर्माण करावे. औषध धोरणातील जाचक अटी व गुंतागुंत दूर करावी. नागरिकांना आवाहन: संपादरम्यान रुग्णालयांशी संलग्न असलेली मेडिकल दुकाने वगळता इतर सर्व किरकोळ औषध दुकाने बंद राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी गैरसोय टाळण्यासाठी जीवनावश्यक व नियमित लागणारी औषधे 19 मे पर्यंत खरेदी करून ठेवावीत, असे आवाहन जाफ्राबाद तालुका अध्यक्ष (ग्रामीण) श्री गजानन पा.शेळके व जालना जिल्हा केमिस्ट संघटनेने केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 4 0 7
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे