pub-7425537887339079
ब्रेकिंग

तननाशक फवारणीमुळे शेतकऱ्याचे नुकसान करून शेतकऱ्यालाच जिवे मारण्याची धमकी दिली.

0 4 7 5 9 1
[sp_wpcarousel id="1375"]

अंबड/अनिल भालेकर,दि.5

तीर्थपुरी पोलीस स्टेशन अंतर्गत रुई येथील कष्टकरी शेतकऱ्याने अत्यंत मेहनतीने शेतात कपाशीची लागवड केली. परंतु शेतालगत तणनाशक फवारणी केल्यामुळे कपाशीचे नुकसान झाले, याबाबत संबंधितांना विचारणा केली असता उलट शेतकऱ्यालाच लोटलाट करत जीवेमारण्याची धमकी देण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी शेतकरी अंगद गोपीनाथ चौरे यांच्या शेतालगत टूफोर्टी तननाशक फवारणी केली असता तेव्हा फिर्यादी शेतकरी हे संबंधितांना समजावून सांगण्यास गेले की,तुम्ही तणनाशकाची फवारणी केल्यामुळे माझ्या शेतातील सरकीचे नुकसान झाले आहे. असे म्हणताच आरोपी अंकुश क्षीसागर, अमोल जगन्नाथ क्षीसागर,अविनाश जगन्नाथ क्षीसागर,बळीराम दामोदर राजगुरू यांनी संगणमत करून फिर्यादी शेतकऱ्यास शिवीगाळ करून फिर्यादीच्या पत्नी नंदाबाई अनंत चौरे यांना पण शिवीगाळ करत लोटलाट केली व फिर्यादी व साक्षीदार यांना आरोप यांनी जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत तीर्थपुरी पोलीस स्टेशन मध्ये भारतीय न्याय संहिता बी एन एस 2023 नुसार 324(4),352,351(2)3(5) नुसार गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे.गुण्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल आगळे हे करत आहे.
शेतकऱ्याचे नुकसान करून देखील उलट शेतकऱ्यालाच जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त करत,संताप व्यक्त केला जात आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 7 5 9 1
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे